थरकाप उडवणारी घटना! दुसरं लग्न केल्यानं महिलेला खांब्याला बांधलं, मारलं, मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 13:05 IST2022-12-15T13:05:42+5:302022-12-15T13:05:59+5:30

सुमारे वर्षभरापूर्वी पतीच्या निधनानंतर तिने दुसरे लग्न केले होते.

An incident of rape of a woman has come to light in Gujarat's Amreli. | थरकाप उडवणारी घटना! दुसरं लग्न केल्यानं महिलेला खांब्याला बांधलं, मारलं, मग...

थरकाप उडवणारी घटना! दुसरं लग्न केल्यानं महिलेला खांब्याला बांधलं, मारलं, मग...

गुजरातमधील अमरेलीमध्ये एका महिलेसोबत अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पीडितेच्या पतीचा चार वर्षांपूर्वी अपघातात मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. सुमारे वर्षभरापूर्वी पतीच्या निधनानंतर तिने दुसरे लग्न केले होते.

पीडित महिलेने दूसरं लग्न केल्यानं पीडितेच्या पहिल्या पतीच्या नातेवाइकांनी तिला मारहाण केली. तसेच महिलेला रस्त्यावर ओढले. त्यानंतर त्याला खांबाला बांधून बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर महिलेचे केसही कापल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बायकोशी बोलू नको, तुला संपवून टाकीन; धमकी, झाडाझुडपात मृतदेह, संशयितही लपले जंगलात!

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी पीडित महिला तिच्या मेव्हण्याला भेटण्यापूर्वी पतीच्या घरी पोहोचली होती. पतीच्या मृत्यूनंतर सासरच्या घरी आल्याने नातेवाईकांनी पीडितेवर राग आणून तिला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. पीडिता घरी येण्यास घरच्यांनी विरोध केला. त्यानंतर या प्रकरणावरून वाद सुरू झाला. 

रागावून घराच्या बाहेर पडली, ढाब्यावर पोहचली; एक भाकरी मागितली अन् पुढे नको ते घडलं...!

सदर वाद इतका वाढला की, पीडित महिलेच्या पहिल्या पतीच्या कुटुंबियातील काही सदस्य लाठ्या-काठ्या घेऊन घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर नातेवाईकांनी महिलेला खांबाला बांधले. त्यानंतर बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीनंतर पीडिता बेशुद्ध झाली होती. त्यानंतर आरोपीने चाकूने तिचे केस कापले. यानंतर पीडित महिलेने जवळील पोलीस स्थानकांत जाऊन सदर आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. यानंतर दोन आरोपींना पोलिसांना पकडण्यात यश आले असून काही जण फरार झाले आहेत. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: An incident of rape of a woman has come to light in Gujarat's Amreli.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.