कपडे व्यवस्थित घालत नाही म्हणून विवाहितेचा छळ; पती अन् सासऱ्याने गाठला कळस
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 13:28 IST2022-02-08T13:28:08+5:302022-02-08T13:28:16+5:30
अधिक माहितीनुसार, फिर्यादी विवाहिता सासरी नांदत असताना आरोपी हे फिर्यादीला विनाकारण घालून पाडून बोलत असत.

कपडे व्यवस्थित घालत नाही म्हणून विवाहितेचा छळ; पती अन् सासऱ्याने गाठला कळस
कपडे व्यवस्थित घालत नाही म्हणून विवाहितेचा छळ करत असल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी ३५ वर्षीय महिलेने शनिवारी (दि. ५) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, विवाहितेचा पती शरद अशोक कदम, सासरे अशोक तुकाराम कदम, दीर गणेश अशोक कदम, सासू, नणंद यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहितीनुसार, फिर्यादी विवाहिता सासरी नांदत असताना आरोपी हे फिर्यादीला विनाकारण घालून पाडून बोलत असत.
फिर्यादीला घरात कोंडून ठेवणे, मोबाईल वापरू न देणे, वारंवार मारहाण करणे, विनाकारण जागे ठेवणे, झोपल्यास पुन्हा मारहाण करणे, सकाळी ऑफिसला जाताना सीमकार्ड लपवून ठेवणे, घरात किचनमध्ये लागणारे साहित्य आणून न देणे, शिवीगाळ करणे, जेवण बनवता येत नाही, कपडे व्यवस्थित घालत नाही, असे म्हणून फिर्यादी विवाहितेला आरोपींनी त्रास दिला. फिर्यादी विवाहितेच्या वडिलांनी हुंडा दिला नाही म्हणून चारचाकी गाडी घेण्यासाठी आई-वडिलांकडून पाच लाख रुपये घेऊन ये, हा हुंडाच समज, असे म्हणून आरोपींनी फिर्यादी विवाहितेला मानसिक व शारीरिक त्रास दिला, असे फिर्यादीत नमूद आहे.