रागाने घर सोडले अन् जाळ्यात अडकला; ४ महिन्यात ३ वेळा अत्याचार, त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2023 08:31 IST2023-05-02T08:31:03+5:302023-05-02T08:31:30+5:30

अखेर, त्याच्या तावडीतून सुटका होताच, तो कुटुंबीयांच्या संपर्कात आला. त्याने घडलेला प्रकार वडिलांना सांगताच, त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली.

An 11-year-old boy was brutally assaulted in Mumbai | रागाने घर सोडले अन् जाळ्यात अडकला; ४ महिन्यात ३ वेळा अत्याचार, त्यानंतर...

रागाने घर सोडले अन् जाळ्यात अडकला; ४ महिन्यात ३ वेळा अत्याचार, त्यानंतर...

मुंबई - रागाने घर सोडणे चेंबूरमधील अल्पवयीन मुलाला महागात पडले. वाटेत एकाची नजर त्याच्यावर पडली आणि त्याच्या विकृत वासनेचा तो शिकार झाल्याची घटना चेंबूरमध्ये घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, चार महिन्यांत तीन वेळा अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. 

चेंबूर परिसरात राहणाऱ्या ११ वर्षीय आर्यनने १ जानेवारी रोजी रागाने घर सोडले. रस्त्यावर भटकत असताना आरोपी भूपेंद्र गोपीया (४२) याची नजर त्याच्यावर पडली. त्याने मुलाला सोबत घेत चेंबूरमध्ये विविध ठिकाणी नेत त्याच्यावर अत्याचार केले. याबाबत कुणाकडे वाच्यता केल्यास जीवेठार मारण्याची धमकी दिली. अखेर, त्याच्या तावडीतून सुटका होताच, तो कुटुंबीयांच्या संपर्कात आला. त्याने घडलेला प्रकार वडिलांना सांगताच, त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा नोंदवत या प्रकरणी चेंबूर पोलिस गोपीयाला अटक करत, अधिक तपास सुरू आहे.

आणखीन एक शिकार
लोअर परळ परिसरातील १२ वर्षीय मुलीवर यातील आरोपी मोहम्मद तेली (४६) याची वाईट नजर पडली होती. आरोपी राजू हा मुलगी एकटी असताना घरी येऊन तिच्याशी जवळीक साधत होता. मुलीच्या अज्ञानाचा फायदा उठवत, आरोपीने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यातून मुलगी गर्भवती राहिल्यानंतर, हा प्रकार समोर आला. ना.म. जोशी मार्ग पोलिसांनी राजू याला अटक केली आहे. 

Web Title: An 11-year-old boy was brutally assaulted in Mumbai