शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
5
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
6
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
7
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
8
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
9
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
10
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
11
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
12
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
13
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
14
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
15
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
16
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
17
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
18
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
19
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
20
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
Daily Top 2Weekly Top 5

क्रिकेट विश्वात भूकंप घडविणारे अमितेश कुमार नागपूरचे नवे पोलीस आयुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 22:22 IST

प्रभावी आणि परिणामकारक पोलिसिंग करणार,  सायबर क्राईमवर विशेष लक्ष : नवनियुक्त पोलीस आयुक्तांचा मनोदय

नरेश डोंगरे ।लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू तसेच दाऊद इब्राहिमच्या हस्तकामध्ये होणारी बातचीत  टेप करून क्रिकेट विश्वात खळबळ उडवून देणारे नागपूरचे तत्कालीन आयपीएस अधिकारी अमितेश कुमार शुक्रवारी नागपुरात आपल्या पदाची धुरा सांभाळणार आहेत. देशाचे हृदयस्थळ असलेल्या नागपूरमध्ये प्रभावी आणि परिणामकारक पोलिसिंग करणार, असा मनोदय त्यांनी आज लोकमत'शी बोलताना व्यक्त केला.

सध्याचे पोलीस आयुक्त डॉ. भूषण कुमार उपाध्याय यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून त्यांची बदली होईल, अशी चर्चा सुरू होती. मात्र  येथे  नवीन  पोलीस आयुक्त  कोण येणार  याबाबत  वेगवेगळी नावे चर्चेला होती. सर्वात आधी  सुनील रामानंद  यांचे नाव चर्चेला आले. त्यानंतर  प्रभात कुमार  राजेंद्रसिंग यांच्याही नावाची चर्चा झाली आणि आज अखेर नागपूरचे पोलीस आयुक्त म्हणून अमितेश कुमार यांच्या नावाची घोषणा झाली. अमितेश कुमार यांनी २००५ ते २००७ अशी दोन वर्षे नागपूरला सेवा दिली आहे. त्यावेळी पोलिस आयुक्त म्हणून येथे शिवप्रतापसिंह यादव होते. नागपुरात आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा सामना होता आणि वेस्ट इंडिजची चमू हॉटेल प्राईड मध्ये मुक्कामी थांबली होती.

अष्टपैलू खेळाडू मरलोन सॅम्युअल यांच्यासाठी  हॉटेल प्राइडच्या लॅंडलाईनवर वारंवार कॉल येत असल्याचे लक्षात आल्यामुळे तत्कालीन पोलिस उपायुक्त अमितेश कुमार यांनी त्यावर नजर रोखली. त्यांच्या समयसुचकतेमुळे जगभरातील  क्रिकेट रसिकांना  मोठा धक्का देणारी  खळबळजनक  बाबू उघड झाली. अंडरवर्ल्ड डॉन तसेच आंतरराष्ट्रीय गुन्हेगार दाऊद इब्राहिम याचा क्रिकेट बॅटिंगचा जगभरात गोरखधंदा सांभाळणारा राईटहॅण्ड मुकेश कोचर हा दुबईतुन मॅच फिक्सिंग साठी वारंवार मरलोन सोबत संपर्क करत होता. हे लक्षात आल्यामुळे अमितेश कुमार यांनी हे संभाषण टेप करून क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली होती. नंतर देश-विदेशातील तपास यंत्रणांनी या प्रकरणावर लक्ष वेधले होते. नागपूर पोलिसांच्या तपासाच्या आधारे आयसीसीने मार्लोन सॅम्युअल्स याच्यावर दोन वर्षाची बंदीही घातली होती.

दरम्यान हा प्रकार उघड केल्याबद्दल तत्कालीन पोलीस आयुक्त  शिवप्रतापसिंह यादव आणि अमितेश कुमार यांचे सर्वत्र कौतुक झाले होते. त्यानंतर अमितेश कुमार येथून बदलून गेले आणि आता  तेरा वर्षानंतर पोलीस आयुक्त म्हणून नागपुरात ते परत येत आहेत. या संबंधाने लोकमत'ने त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी नागपूरला प्रभावी आणि परिणामकारक सेवा देऊ, असा मनोदय जाहीर केला. अर्थशास्त्र (इकॉनॉमिक्स) आणि सायबर कायद्याची मास्टरी बाळगणारे अमितेश कुमार नागपुरातील सायबर गुन्हेगारी वरही ही खास नजर ठेवणार आहेत.  तेरा वर्षांपूर्वी नागपुरातील स्थिती वेगळी होती. आताचे गुन्हेगारी स्वरूप बदलले आहे. त्यामुळे येथील परिस्थितीचा अभ्यास करून नंतर आपण आपली भूमिका ठरवू, असे ते म्हणाले. नागरिक आणि पोलिसांचे सलोख्याचे संबंध प्रस्थापित करण्यासोबतच सर्वांना सोबत घेऊन आपण येथे काम करू, असे ते म्हणाले.शुक्रवारी आपण पदाची जबाबदारी स्वीकारू, असेही त्यांनी लोकमतला सांगितले.

टॅग्स :nagpurनागपूरCricket Bettingक्रिकेट सट्टेबाजीPoliceपोलिस