शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
5
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
6
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
7
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
8
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
9
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
10
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
11
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
12
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
13
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
14
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
15
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
16
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
17
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
18
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
19
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
20
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल

अमित शहा, योगी आदित्यनाथांच्या जिवाला धोका; मंदिरात हल्ला करण्याचा सीआरपीएफला मेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 17:55 IST

threat mail was received by CRPF: कोणत्याही धार्मिक स्थळावर दोन्ही नेत्यांवर हल्ला केला जाईल. हा मेल आल्याने सीआरपीएफच्या हेड ऑफिसमध्ये खळबळ उडाली. याची माहिती अन्य सुरक्षा यंत्रणांना देण्यात आली आहे. सीआरपीएफला मंगळवारी सकाळी हा मेल मिळाला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah) आणि उत्तर प्रदेशचे मुख्य़मंत्री योगी आदित्यनाथ (UP CM Yogi Adityanath) यांच्या जिवाला धोका आहे. मुंबईतील केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाच्या (CRPF) मुख्यायाला एक मेल मिळाला आहे. यामध्ये येणाऱ्या काही दिवसांत गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची हत्या करण्यात येणार आहे, असे म्हटले आहे. (A threat mail was received by CRPF in Mumbai a few days ago naming Union Home Minister Amit Shah and UP CM Yogi Adityanath, concerned agencies have been informed: CRPF sources)

कोणत्याही धार्मिक स्थळावर दोन्ही नेत्यांवर हल्ला केला जाईल. हा मेल आल्याने सीआरपीएफच्या हेड ऑफिसमध्ये खळबळ उडाली. याची माहिती अन्य सुरक्षा यंत्रणांना देण्यात आली आहे. सीआरपीएफला मंगळवारी सकाळी हा मेल मिळाला.

या आधीही अमित शहा आणि योगी आदित्यनाथांना अशाप्रकारची धमकी मिळालेली आहे. प्रजासत्ताक दिनी अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अन्य नेत्यांची हत्या करण्य़ाच्या धमकीचे पत्र मिळाले होते. 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना देखील या आधी अनेकदा जिवे मारण्य़ाची धमकी मिळाली होती. जानेवारीत त्यांना एकदा धमकी मिळाली होती. डायल 112 च्या व्हॉट्सअॅप नंबरवर मेसेज आला होता. यामध्ये योगींना 24 तासांच्या आत जिवे मारणार आहोत. शोधू शकत असाल तर शोधा, एके-47 द्वारे त्यांना 24 तासांत मारणार आहे, असा तो मेसेज होता. यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. आरोपी अल्पवयीन होता. योगीच्या जिवाला धोका असल्याचे आयबीने देखील म्हटले होते. त्यानंतर त्यांना Z+ सुरक्षा देण्यात आली आहे.  

योगी सरकारला हायकोर्टचा दणका; पोलिसांकडून NSA चा गैरवापर, ९४ प्रकरणे रद्द

एनएसएअंतर्गत दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांसंदर्भातील याचिकांवर अलाहाबाद उच्च न्यायालयाने सुनावणी करण्यात आली. यावेळी उच्च न्यायालयाने योगी सरकारला दणका देत १२० पैकी ९४ प्रकरणे रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच एनएसएअंतर्गत गुन्हे नोंदवलेल्यांची निर्दोष मुक्तता करण्यास सांगितले आहे. (allahabad high court slams yogi adityanath govt)

जानेवारी २०१८ ते डिसेंबर २०२० दरम्यान राष्ट्रीय सुरक्षा कायद्यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांसंदर्भातील याचिकांवर अलाहाबाद उच्च न्यायालयाने सुनावणी केली. या सुनावणीदरम्यान १२० पैकी ९४ प्रकरणे ही राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत येत नसून, ९४ प्रकरणांसंदर्भात ३२ जिल्हाधिकाऱ्यांना न्यायलायने आदेश दिले आहेत. अगदी गोहत्येपासून ते सर्वसामान्य गुन्ह्यांसाठी राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी अनेक प्रकरणांमध्ये पोलिसांनी काहीही विचार न करता एनएसए लावल्याचे निरिक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.

टॅग्स :Amit Shahअमित शहाyogi adityanathयोगी आदित्यनाथ