शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
2
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
3
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
4
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
5
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
6
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
7
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
8
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
9
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
10
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
11
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
12
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
13
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
14
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
15
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
16
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
17
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
18
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
19
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
20
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते

धक्कादायक! सपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी; वृद्धाला त्याच्या लेकासह पोलिसांसमोरच केली मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 19:04 IST

कायद्याला न घाबरता सपा नेत्याच्या मुलाने पोलिसांच्या उपस्थितीत सीओ कार्यालयासमोर एका वृद्ध व्यक्तीला आणि त्याच्या मुलाला मारहाण केली आहे. 

उत्तर प्रदेशातील अमेठीमध्ये समाजवादी पक्षाच्या नेत्याच्या मुलाने गुंडगिरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कायद्याला न घाबरता सपा नेत्याच्या मुलाने पोलिसांच्या उपस्थितीत सीओ कार्यालयासमोर एका वृद्ध व्यक्तीला आणि त्याच्या मुलाला मारहाण केली आहे. 

सपा नेत्याने मौल्यवान जमिनीवर अतिक्रमण केल्याचा गंभीर आरोप वृद्ध व्यक्तीने केला आहे. त्यांनी आपल्या मुलासह याप्रकरणी तक्रार केली होती. त्यामुळे सपा नेत्याच्या मुलाने वृद्धासह त्याच्या मुलाला सार्वजनिक ठिकाणी बेदम मारहाण केली.

गंगौली गावातील रहिवासी आणि सपा नेते शिव प्रताप यादव यांचा मुलगा प्रदीप यादव याची गुंडगिरी पाहायला मिळाली. त्याने व त्याच्या साथीदारांनी पोलिसांसमोरच वृद्धाचा आणि त्याच्या मुलाचा पाठलाग केला आणि त्याला मारहाण केली. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांसह इतर लोकही उपस्थित होते. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

रामयश यादव यांनी आरोप केला आहे की, शिव प्रताप यादव यांनी त्यांच्या गावातील आरक्षित जमिनीवर अतिक्रमण केलं आहे, त्याबाबत आम्ही तक्रार केली आहे. यामुळे सपा नेते शिव प्रताप यादव खूप संतापले. आज खुनास येथील परिसरात त्यांच्या मुलाने आमच्यावर हल्ला केला. मला आणि मुलालाही लाथा-बुक्क्यांनी मारलं, बेदम मारहाण केल्याचं सांगितलं. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSamajwadi Partyसमाजवादी पार्टीUttar Pradeshउत्तर प्रदेश