धक्कादायक! युवकाला स्वप्नात दिसला चोर; स्वतःवरच झाडली गोळी अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 12:39 IST2023-06-16T12:35:49+5:302023-06-16T12:39:02+5:30

स्थानिक माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, ही व्यक्ती झोपेत आपल्या घरात चोरीचे स्वप्न बघत होती. याच वेळी ही भयंकर घटना घडली.

america man accidentally shoots himself in sleep while saw a thief in his dream | धक्कादायक! युवकाला स्वप्नात दिसला चोर; स्वतःवरच झाडली गोळी अन्...

धक्कादायक! युवकाला स्वप्नात दिसला चोर; स्वतःवरच झाडली गोळी अन्...

अमेरिकेतील इलिनॉइसमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका व्यक्तीने झोपेतच आपल्या पायावर गोळी मारल्याचा आरोप आहे. स्थानिक माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, ही व्यक्ती झोपेत आपल्या घरात चोरीचे स्वप्न बघत होती. याच वेळी ही भयंकर घटना घडली.

केंव्हा घडली घटना?
ही घटना 10 एप्रिलरोजी घडली. लेक काउंटी शेरिफ कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा डेप्युटी साइटवर पोहोचले, तेव्हा त्यांनी 62 वर्षीय मार्क डिकारा यांना पायावर बंदुकीची गोळी लागलेल्या अवेस्थेत पाहिले. तेव्हा डिकारा यांच्या पायातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होत होता. यामुळे त्यांच्या पायावर तत्काळ एक टुर्निकेट लावण्यात आले. 

जेव्हा पोलिसांनी त्यांची चौकशी केली, तेव्हा डिकारा यांनी घरात चोर शिरल्याचे आणि त्यांनी त्याच्या पायावर .357 मॅग्नम रिव्हॉल्वरने गोळी झाडल्याचे स्वप्न पाहिल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यात डिकारा स्वतःच्याच पायावर गोळी मारून घेतली आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बंदुकीची गोळी डिकारा यांच्या पायाला लागून त्यांच्या अंथरुनात शिरली. यावेळी डिकारा यांच्या घरात चोरीचा प्रयत्न झाला नव्हता, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. शेरिफ कार्यालयाने म्हटल्यानुसार, डिकारा यांना सोमवारी (12 जून) एका वॉरंटवर अटक करण्यात आली होती. यानंतर 150,000 डॉलरच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन देण्यात आला.
 

Web Title: america man accidentally shoots himself in sleep while saw a thief in his dream