आई शप्पथ! अंबानींच्या सुरक्षारक्षकाचे महागडे शूज चोरीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 18:18 IST2019-09-26T17:50:27+5:302019-09-26T18:18:09+5:30

बाबुलनाथ मंदिर परिसरातून गेले चोरीला

Ambani's security guard's expensive shoes has stolen from babulnath temple premise | आई शप्पथ! अंबानींच्या सुरक्षारक्षकाचे महागडे शूज चोरीला

आई शप्पथ! अंबानींच्या सुरक्षारक्षकाचे महागडे शूज चोरीला

ठळक मुद्देशोध घेऊनही बूट न सापडल्याने त्यांनी मंदिराचे सीसीटीव्ही तपासले. हिरव्या रंगाचे शर्ट घातलेली व्यक्ती ते बूट घालून जाताना दिसली. गावदेवी पोलीस तपास करत आहेत.

मुंबई - अंबानींच्या सुरक्षारक्षकाचे साडेबारा हजारांचे बूट मंदिराबाहेरून चोरीला गेल्याने मुंबई पोलीस कामाला लागले आहेत. रवींद्र प्रताप सिंग (३८) असे अंबानी कुटुंबाच्या सुरक्षारक्षकाचे नाव आहे. त्यांनी आठवड्याभरापूर्वीच साडेबारा हजार रुपयांचे ब्रॅण्डेड बूट खरेदी केले होते. नवीन बूट घालून सोमवारी सकाळी पावणेसातच्या सुमारास ते बाबुलनाथ मंदिरात दर्शनासाठी गेले. त्यांनी शूज स्टॅण्डवर ठेवले. अर्ध्या तासानंतर बाहेर आल्यावर बूट हरवल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. शोध घेऊनही बूट न सापडल्याने त्यांनी मंदिराचे सीसीटीव्ही तपासले. त्यात हिरव्या रंगाचे शर्ट घातलेली व्यक्ती ते बूट घालून जाताना दिसली. त्यानुसार, गावदेवी पोलीस तपास करत आहेत.

Web Title: Ambani's security guard's expensive shoes has stolen from babulnath temple premise