शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 13:20 IST

Rajasthan Murder News: राजा रघुवंशी हत्या प्रकरणासारखी एक घटना समोर आली आहे. या घटनेत पत्नीने घरीच प्रियकराला बोलवून घेतले. त्यानंतर सुपारी दिलेल्या आरोपींच्या मदतीने पतीला संपवले. 

Alwar Murder News: प्रियकरासोबत पतीच्या हत्येचा कट रचला. त्यानंतर दोन लाखांत पतीच्या हत्येची सुपारी दिली. घरीच त्या लोकांना बोलावले आणि नजरेसमोरच पतीची हत्या केली. पण, कुणालाही संशय येऊ नये म्हणून दुसऱ्या दिवशी पतीचा मृत्यूने आपण हादरलो असल्याचे दाखवण्यासाठी आक्रोशही केला. हत्या लपवण्याचा प्रयत्न झाला, पण सत्य समोर आलंच! ही घटना घडली आहे राजस्थानातील अलवर जिल्ह्यात. प्रेमसंबंधात अडथळा ठरत असलेल्या पतीची हत्या करणाऱ्या महिलेचे खरे रुप तिच्याच मुलाने समोर आणले. हत्येचा सगळा घटनाक्रम ऐकल्यानंतर पोलीसही चक्रावून गेले. 

लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

सोनम रघुवंशीने जशी पतीची हत्या केली, तशीच घटना राजस्थानात घडली आहे. महिलेने प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केली. अलवर जिल्ह्यातील खेडलीमध्ये एका महिलेने दोन लाखात पतीच्या हत्येची सुपारी दिली. प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली. त्यानंतर सकाळी रडारड करू लागली. पण, ९ वर्षाच्या मुलाने आईने केलेल्या हत्येचा सगळा घटनाक्रम सांगितला आणि पोलीसही हादरले. ९ वर्षाच्या मुलामुळे हत्येच्या प्रकरणाला वाच्या फुटली. 

मम्मीने दरवाजा उघडला, हत्या होत असताना मम्मी बघत होती

महिलेच्या ९ वर्षाच्या मुलाने सांगितले की, "मी झोपेत होतो. त्याचवेळी दरवाजाजवळून हळू आवाजात बोलत असल्याचे ऐकायला आले. मी डोळे उघडले, तेव्हा बघितले मम्मीने दरवाजा उघडला. बाहेर काशी काका उभे होते. त्यांच्यासोबत चार लोक होते."

वाचा >>चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती

"मी उठलो. मम्मी बाजूला उभी होती. पप्पाला त्या लोकांनी पकडून ठेवले होते. त्यांच्या तोंडावर मारले. त्यांचे पाय पिरगळे आणि नंतर गळा दाबला. काशी काकाने उशीने पप्पाचे तोंड दाबून ठेवलेले होते', असे नऊ वर्षाच्या मुलाने पोलिसांना सांगितले. 

दोन लाखात दिली पतीची सुपारी

पोलिसांनी हत्ये प्रकरणात मयत व्यक्तीची पत्नी अनिता, तिचा प्रियकर आणि इतर तरुणांना अटक केली. मयत व्यक्तीचे नाव वीरू असे आहे. त्याला पत्नीचे काशीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचे कळले. त्यावरून दोघांमध्ये वाद होऊ लागला. अनिताने प्रियकरासोबत मिळून त्याचा काटा काढण्याचे ठरवले. 

वीरूचा मृतदेह मिळाल्यानंतर त्याच्या भावाने अनितावर हत्येचा आरोप केला होता. १५० पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज पोलिसांनी तपासले. इतर माहितीही मिळवली. त्यातून अनितानेच प्रियकर आणि भाड्याच्या गुंडाकरवी पतीची हत्या केल्याचे समोर आले. त्यासाठी गुंडांना दोन लाखांची सुपारी देण्यात आली होती. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदारPoliceपोलिसRajasthanराजस्थान