शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
2
तुम्ही बिनशर्त पाठिंबा सगळं गुजरातला देण्यासाठी दिलाय का? आदित्य ठाकरेंचा मनसैनिकांना खोचक टोला
3
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक
4
17000 राजकारणी, अब्जाधीशांनी देश बुडविला; पाकिस्तानींनी दुबईत घेतली तब्बल 23000 घरे
5
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
8
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
9
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
10
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
11
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
12
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
13
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
14
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
15
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
16
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
17
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
18
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार
19
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
20
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल

कुख्यात गुंड अक्षय राठोडचा पोलीस पथकावर हल्ला,एपीआय जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2020 6:57 PM

अवैध रेती उत्खननातून आर्थिक पाठबळ मिळत असल्याने अक्षय राठोड व त्याच्या टोळीचे मनोबल वाढले आहे. यातूनच बसस्थानक चौकात अवधूतवाडी ठाण्यातील शोधपथकावर या टोळीने हल्ला केला.

यवतमाळ - शहरात कुख्यात अक्षय राठोडने आपला जम बसविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अवैध रेती उत्खननातून आर्थिक पाठबळ मिळत असल्याने अक्षय राठोड व त्याच्या टोळीचे मनोबल वाढले आहे. यातूनच बसस्थानक चौकात अवधूतवाडी ठाण्यातील शोधपथकावर या टोळीने हल्ला केला. यात सहायक पोलीस निरीक्षक किरकोळ जखमी झाले. ही घटना शनिवारी रात्री ११.३० वाजतादरम्यान घडली. अपर पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी शनिवारी रात्री आॅल आऊट मोहीम राबविण्याचे निर्देश पोलिसांना दिले होते. त्यावरूनच अवधूतवाडी पोलीस ठाण्यातील शोधपथक बसस्थानक चौक परिसरात गस्त घालत होते. यावेळी त्यांना अक्षय राठोड हा जाताना दिसला.गंभीर स्वरूपाचे गुन्हे असलेला अक्षय रात्री ११.३० वाजता कुठे फिरत आहे, अशी चौकशी पोलिसांनी सुरू केली. अक्षय राठोड व त्याच्यासोबत असलेल्या इतर तिघांची झडती पोलिसांनी घेतली. यावरूनच अक्षय राठोड याने वाद घालत मै यवतमाल का भाई हू, अक्षय राठोड हू अशा शब्दात धमकावत पोलिसांशी वाद घालणे सुरू केले. त्याच्या सहकाºयांनी दगडफेक केली. यात सहायक पोलीस निरीक्षक विवेक देशमुख यांच्या उजव्या पायाच्या टोंगळ्याला व छातीला दगड लागला. झटापट करून ते चौघेही पळून जाण्याच्या तयारीत होते.पोलिसांनी प्रयत्नपूर्वक त्या चौघांनाही ताब्यात घेतले. अक्षय राठोड याच्याजवळ धारदार चाकू मिळून आला. या प्रकरणी शिपाई सुधीर पुसदकर याने तक्रार दिली. त्यावरून अक्षय आत्माराम राठोड (३०) रा.चांदेरेनगर, मोहा फाटा, शुभम हरिओमप्रसाद बघेल (२४) रा.वैभवनगर, बगीरा ऊर्फ आशीष रमेश दांडेकर (३०) रा.चमेडियानगर, सचिन मेघश्याम वाढवे (३१) रा.चांदेरेनगर, धामणगाव रोड यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३५३, ३३२, ३४ व आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीYavatmalयवतमाळ