Ajay Devgan's car stop on road by punjabi man; he arrested by dindoshi police | अजय देवगणची कार अडवणाऱ्याला पोलिसांनी केली अटक; वाचा का अडवली शेतकऱ्यानं कार

अजय देवगणची कार अडवणाऱ्याला पोलिसांनी केली अटक; वाचा का अडवली शेतकऱ्यानं कार

ठळक मुद्देमंगळवारी सकाळी गोरेगावमधील दिंडोशी परिसरातील ही घटना घडली. अजय देवगण आपल्या कारच्या आत बसलेला दिसत आहे. 

मुंबई उपनगरातील गोरेगावमध्ये अभिनेता अजय देवगणचीकार एका पंजाबी व्यक्तीने रस्त्यात अडवली. शेतकरी आंदोलनाशी संबंधीत या व्यक्तीने सुमारे पंधरा मिनिटे कार रोखून धरली आणि शेतकरी आंदोलनाला पाठिंबा का नाही देत असा प्रश्न देवगणला विचारला. या घटनेनंतर तात्काळ पोलिसांना बोलवण्यात आले. पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली आहे. राजदीप सिंह (२८) असं अटक व्यक्तीचं नाव आहे. 

बॉलिवूडमधील सिंघम अजय देवगणची कार शेतकरी चळवळीशी संबंधित व्यक्तीने अडवली. अजय देवगण शूटिंगसाठी फिल्मसिटीला जात असताना निहंगसिंग नावाच्या या व्यक्तीने त्याची कार थांबविली आणि शेतकरी आंदोलनाला पाठिंबा का देत नाही असा प्रश्न विचारु लागला.

मंगळवारी सकाळी गोरेगावमधील दिंडोशी परिसरातील ही घटना घडली. अजय देवगण आपल्या कारच्या आत बसलेला दिसत आहे. आरोपी राजदीप सिंह देवगणला पंजाबचा शत्रू म्हणून बोलतो. आरोपी व्यक्ती दिल्लीत बरेच दिवस शेतकरी आंदोलन करत आहेत, पण अजय देवगण त्यांच्या समर्थनार्थ ट्विट का करत नाहीत असा जाब त्याला विचारत आहे. फिल्मसिटीनजीक परिसरात जवळपास १५ ते २० मिनिटे हा गोंधळ सुरूच होता. पोलिसांनी राजदीपला अटक केली आहे.

Web Title: Ajay Devgan's car stop on road by punjabi man; he arrested by dindoshi police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.