विमानतळ पोलिसांकडून संशयित काश्मिरी इसमासह वकिलाला अटक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2021 05:13 IST2021-12-26T05:13:14+5:302021-12-26T05:13:42+5:30

Crime News : या दोघांची अधिक चौकशी पोलीस करत असल्याचे देखील समजते.

Airport police arrest lawyer along with suspected Kashmiri Man in Mumbai | विमानतळ पोलिसांकडून संशयित काश्मिरी इसमासह वकिलाला अटक!

विमानतळ पोलिसांकडून संशयित काश्मिरी इसमासह वकिलाला अटक!

मुंबई: सहारच्या विमानतळ पोलिसांनी एका काश्मिरी इसमासह एका वकिलाला अटक केल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्याकडून काही संशयित कागदपत्रे हस्तगत करण्यात आली असून याबाबत अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काश्मिरी इसम हा दारूच्या नशेत वाद घालत होता. त्यामुळे सहार पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तेव्हा त्याच्या वागणुकीवर अधिकच संशय आल्याने पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर त्याला घेऊन पोलीस त्याच्या घरी गेले आणि घराची झडती घेतली. तेव्हा पोलिसांना त्याच्या घरी १२ लिव्ह अँड लायसन्सची कागदपत्रे मिळाली असून त्यात एकाच मालकाच्या नावाचा उल्लेख असून सर्वांवर तारीखही सारखीच असल्याची माहिती मिळत आहे. 

तसेच, या काश्मिरी इसमासोबत असलेल्या वकिलाला देखील अटक करण्यात आली आहे, जो नोटरीचे काम करतो. यानुसार या दोघांची अधिक चौकशी पोलीस करत असल्याचे देखील समजते. याबाबत परिमंडळ ८ चे पोलीस उपायुक्त डॉ. डी एस स्वामी यांना मेसेज आणि फोन करत संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो होऊ शकला नाही.

Web Title: Airport police arrest lawyer along with suspected Kashmiri Man in Mumbai

टॅग्स :Arrestअटक