शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बाबो! व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये भरली हवा, त्यानंतर जे हाल झाले ते पाहुन डॉक्टरही झाले शॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 18:50 IST

एका व्यक्तीच्या सहकाऱ्याने त्याच्या गुप्तांगात हवा भरली. यामुळे या व्यक्तीचं आतडं फुटलं. त्याचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांना सर्जरी करावी लागली. मध्य प्रदेशच्या उज्जैनमधली ही धक्कादायक घटना आहे.

भांडणं विकोपाला गेल्यानंतर लोक कोणत्याही थरापर्यंत जातात किंवा बऱ्याच वेळा मस्करीची कुस्करी होते. असंच एक प्रकरण समोर आलं आहे, ज्यात एका व्यक्तीच्या सहकाऱ्याने त्याच्या गुप्तांगात हवा भरली. यामुळे या व्यक्तीचं आतडं फुटलं. त्याचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांना सर्जरी करावी लागली. मध्य प्रदेशच्या उज्जैनमधली ही धक्कादायक घटना आहे.

आगर रोडमधील ग्राम बांदकामध्ये कुरकुरे बनवण्याचा एक कारखाना आहे. इथं उज्जैनमधील कमल सिंह राजपूत आणि पान बिहारमधील भर चौहान काम करतात. १६ फेब्रुवारीला ते दोघं एकत्र काम करत होते. त्यावेळी भरतने कमलच्या गुप्तांगात कम्प्रेसरने हवा भरली. त्यावेळी कमलला काही झालं नाही पण काही वेळाने त्याची प्रकृती बिघडली. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्याची तपासणी केली तेव्हा धक्काच बसला. त्याचं आतडं फुटलं होतं. त्यानंतर त्याच्यावर सर्जरी करण्यात आली. सर्जरी करून त्याचा जीव वाचवण्यात आला.

याबाबत कारखाना प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार कुरकुरे जास्त कालावधीपर्यंत पाकिटात सुरक्षित राहावेत यासाठी त्यामध्ये गॅस भरलं जातं. यासाठी कम्प्रेसरचा वापर होतो. दोन्ही कर्मचारी तीन दिवस कारखान्यात आले नाही, त्यावेळी या घटनेबाबत माहिती मिळाली. प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. पण त्यामध्ये १० दिवसांची रेकॉर्डिंग स्टोअर होते. त्यामुळे या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले नाहीत.

अमर उजालाच्या वृत्तानुसार पोलिसांनी जीवघेण्या हल्ल्याचा गुन्हा नोंदवला. आरोपीला कोर्टाने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. हे सर्व मजेत करण्यात आलं की यामागे आणखी काही कारण होतं, हे नेमकं समजलं नाही आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके