शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

AIMIM नेते वारिस पठाण यांना मुंबई पोलिसांनी ठेवलं नजरकैदेत, हिजाबच्या वादावर करणार होते आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 9:55 PM

Hijab Controversy : हिजाब बंदीच्या विरोधात शांततापूर्ण आंदोलनात सहभागी होणार असल्याने त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

AIMIM नेते वारिस पठाण यांना मुंबईत नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. स्वतः वारिस पठाणने त्याच्या ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे. काही छायाचित्रे शेअर करताना वारिसने सांगितले की, त्यांना त्याच्या मुंबईतील घरी नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. हिजाब बंदीच्या विरोधात शांततापूर्ण आंदोलनात सहभागी होणार असल्याने त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, "मालाड मुंबईतील एआयएमआयएम मुंबई महिला युनिटने हिजाब बंदीच्या विरोधात आयोजित केलेल्या शांततापूर्ण आंदोलनात सहभागी होणार असल्याने मला मुंबई पोलिसांनी माझ्या वरळीतील निवासस्थानी नजरकैदेत ठेवले आहे. MVA सरकारच्या राजवटीत लोकशाही उरली आहे का?आदित्य ठाकरेंनी बंदीला पाठिंबा दिलामहाराष्ट्राचे मंत्री आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. या सर्व वादांवर लक्ष केंद्रित न करता केवळ शाळांमधील अभ्यासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे आदित्यचे म्हणणे आहे. या वादाबाबत आदित्य म्हणाले की, "शाळा आणि कॉलेजसाठी गणवेश ठरवला जातो आणि त्याचे पालन व्हायला हवे. शिक्षण केंद्रांमध्ये केवळ शिक्षणावरच लक्ष केंद्रित केले पाहिजे. शाळा, महाविद्यालयांमध्ये धार्मिक आणि राजकीय विषय आणू नयेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण?कर्नाटकातील उडुपी येथील सरकारी पीयू कॉलेजमध्ये जानेवारी महिन्यात हिजाब परिधान केलेल्या ६ मुस्लिम विद्यार्थिनींना वर्गात बसण्यापासून रोखण्यात आले होते. महाविद्यालयाने गणवेश धारणाचे कारण सांगितले, त्यानंतर विद्यार्थिनींनी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि असा युक्तिवाद केला की त्यांना हिजाब घालण्याची परवानगी न देणे हे घटनेच्या कलम 14 आणि 25 अंतर्गत मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे.या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती कृष्णा दीक्षित म्हणाले, 'आम्ही तर्काने चालू, कायद्याने चालवू. कोणाच्याही उत्कटतेतून किंवा भावनांच्या बाहेर नाही. संविधान सांगेल तेच करणार. संविधान ही आपल्यासाठी भगवद्गीता आहे. मी संविधानाचे पालन करण्याची शपथ घेतली आहे. तुमच्या भावना बाजूला ठेवा. हे सर्व रोज घडताना आपण पाहू शकत नाही.

 

 

टॅग्स :Waris Pathanवारिस पठाणAll India Majlis-e-Ittehadul Muslimeenआॅल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनMumbaiमुंबईPoliceपोलिस