एम्सच्या महिला डॉक्टरवर बलात्कार, वरिष्ठ निवासी डॉक्टरवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 08:46 AM2021-10-16T08:46:04+5:302021-10-16T08:46:28+5:30

Crime News:

AIIMS female doctor raped, senior resident doctor charged | एम्सच्या महिला डॉक्टरवर बलात्कार, वरिष्ठ निवासी डॉक्टरवर गुन्हा

एम्सच्या महिला डॉक्टरवर बलात्कार, वरिष्ठ निवासी डॉक्टरवर गुन्हा

Next

 नवी दिल्ली : एम्सच्या वरिष्ठ निवासी डॉक्टरने कनिष्ठ महिला डॉक्टरला घरी पार्टीसाठी बोलावून बलात्कार केला. पार्टीमध्ये महिला डॉक्टरला दारू पाजल्यानंतर ही घटना घडल्याचा आरोप आहे. महिला डॉक्टरांच्या तक्रारीवरून हौज खास पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैद्यकीय तपासणीत या घटनेला दुजोरा मिळाला आहे. मात्र, तक्रार प्राप्त होऊन दोन दिवस झाले, तरी आरोपी डॉक्टरला अटक करण्यात आलेली नाही.
आरोपी डॉक्टर एम्सच्या लॅब मेडिसिन विभागात वरिष्ठ निवासी अधिकारी आहे. तो आपल्या कुटुंबासह हौज खास परिसरात राहतो. पीडित महिलाही एम्समध्ये कनिष्ठ निवासी अधिकारी आहे. पीडितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये आरोपी डॉक्टरने १० ऑक्टोबर रोजी त्याच्या घरी पार्टी दिली होती. पार्टीमध्ये दारूही देण्यात आली.  

आरोप काय?
- पीडितेला दारू पिण्यास भाग पाडल्याचाही आरोप आहे. दारू प्यायल्यानंतर पीडित व्यक्ती नशेच्या आहारी गेली. ती डॉक्टरांच्या घरी राहिली. आरोपी डॉक्टरने दारूच्या प्रभावाखाली हा गुन्हा केल्याचा आरोप आहे.
- दुसऱ्या दिवशी शुद्धीवर आल्यावर पीडितेने विरोध केला. आरोपी डॉक्टरने जीवे मारण्याची धमकी दिली. पीडितेने हौज खास पोलीस ठाण्यात तक्रार दिली. 
- हौज खास पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या प्रकरणाची चौकशी केली जात असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.  

Web Title: AIIMS female doctor raped, senior resident doctor charged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app