शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

बाबो! प्राध्यापक पतीने पत्नीच्या मैत्रिणींसोबत महिला बनून केलं अश्लील चॅटींग आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2021 12:55 IST

प्राध्यापक असलेल्या पतीला आपल्या प्राध्यापिका असलेल्या पत्नीवर संशय होता. अशात त्याने पत्नीची माहिती मिळवण्यासाठी एका महिलेच्या नावाने फेक फेसबुक आयडी तयार केलं.

पती आणि पत्नीचं नातं विश्वासावर टिकून असतं. पण या नात्यात जर शंकेने डोकावलं तर नात्यात अनेक एकापाठी एक अनेक अडचणी येणं सुरू होतं. उत्तर प्रदेशच्या आग्रामधून पती-पत्नीमध्ये संशय निर्माण झाल्यावर एक अजब घटना घडल्याचं समोर आलं आहे. 

प्राध्यापक असलेल्या पतीला आपल्या प्राध्यापिका असलेल्या पत्नीवर संशय होता. अशात त्याने पत्नीची माहिती मिळवण्यासाठी एका महिलेच्या नावाने फेक फेसबुक आयडी तयार केलं. या फेक फेसबुक आयडीच्या माध्यमातून पतीने आपल्या पत्नीच्या मैत्रिणींसोबत मैत्री केली. (हे पण वाचा : भयंकर! लेकीचा 4 सेकंदाचा Voice Message ऐकून कुटुंबाला मोठा धक्का; 3 महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न)

पती महिला बनून सोशल मीडियावर आपल्या पत्नीच्या मैत्रिणींसोबत अश्लील संवाद करत होता. इतकंच नाही तर प्राध्यपक पतीने आपल्या पत्नीचे अश्लील व्हिडीओही तयार केले आणि त्यांना पाठवले. या व्यक्तीला फेक फेसबुक अकाऊंटच्या माध्यमातून आपल्या पत्नीवर लक्ष ठेवायचं होतं. 

ती कुठे जाते, कुणाशी बोलते हे त्याला जाणून घ्यायचं होतं. हळूहळू त्याचा संशय अधिक वाढला तर त्याने पत्नीला मारहाण केली आणि कौटुंबिक हिंसा सुरू केली. प्राध्यापक पतीच्या अत्याचाराविरोधात प्राध्यापिक पत्नीने आग्र्यातील महिला पोलीस स्टेशनमध्ये १० ऑक्टोबर २०२० ला गुन्हा दाखल केला होता. (हे पण वाचा : गुढ वाढलं! पत्नी आणि मुलाचा खून करणाऱ्या पतीची धक्कादायक बाब समोर, नदीत आढळला पतीचाच मृतदेह)

पोलिसांनी याप्रकरणी कारवाई केली आणि प्राध्यापक पतीचा मोबाइक ताब्यात घेतला होता. पत्नीचा असाही आरोप आहे की, तिच्या पतीने आणखी एक मोबाइल लपवून ठेवला होता ज्याद्वारे तो तिचे व्हिडीओ काढत होता आणि फेक फेसबुक अकाऊंट चालवत होता. त्याने तपास भरकटवण्यासाठी दुसरा मोबाइल पोलिसांना दिला होता. 

वाराणसी येथे कार्यरत प्राध्यापकचं १९ एप्रिल २०१९ मध्ये आग्रा येथे कार्यरत महिला प्राध्यापिकेसोबत लग्न झालं होतं. लग्नाच्या काही दिवसांनंतरच दोघांमध्ये वाद सुरू झाले होते. दोघांमध्ये मारहाणही झाली होती. महिला प्राध्यापिकेने वैतागून आग्र्यात आपल्या पती विरोधात आणि त्याच्या परिवाराविरोधात तक्रार दाखल केली होती. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी