शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! मंदिर परिसरातच साधूची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 19:41 IST

Crime News : मंदिर परिसरात एका साधूची धारदार शस्त्राने अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे.

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना सातत्याने समोर येत आहेत. उत्तर प्रदेशच्या आग्रा येथे एक भय़ंकर घटना समोर आली आहे. मंदिर परिसरात एका साधूची धारदार शस्त्राने अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, यमुना नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या जंगलात एक हनुमानाचं मंदिर बांधलं गेलं आहे. या मंदिरात मृत साधू शिव गिरी पूजा पाठ करायचं काम करत होते, तसेच ते मंदिराच्या आवारातच राहत असत.

साधूच्या हत्येनं परिसरात खळबळ उडाली आहे. मंदिराच्या आवारात त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करुन अज्ञातांनी त्यांची निर्घृण हत्या केली आहे. स्थानिकांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, रक्ताच्या थारोळ्यात साधू मंदिर परिसरात पडले होते. स्थानिकांनी लगेचच पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. या साधूची हत्या कोणी केली आणि का केली? याचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

आग्रा सीटीचे एसपी रोहन पी बोत्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, साधूची कुऱ्हाडीने वार करून हत्या करण्यात आली आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. तसेच आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तयारी केली आहेत. लवकरच आरोपींना अटक केली जाईल असंही त्यांनी सांगितलं आहे. आम्ही सध्या या हत्येमागील गुढ शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेली कुऱ्हाड जप्त करण्यात आली आहे. तसेच मारेकऱ्याचा शोध घेण्यासाठी डॉग स्क्वॉड आणि फॉरेन्सिक्स टीमलाही पाचारण केलं आहे.

चोरी किंवा लुटमारीच्या हेतुने ही हत्या झाल्याचा कोणताही पुरावा मिळाला नाही. त्यामुळे कोणी तरी ओळखीच्या व्यक्तीने ही हत्या केली असावी, असा संशय पोलिसांना आहे. या हत्येचा खुलासा करण्यासाठी सर्व्हिलन्सची टीमलाही तैनात केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  दंगल गर्ल गीता आणि बबीता फोगट (Geeta and Babita Phogat Sister) यांच्या मामे बहिणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कुस्तीच्या सामन्यात पराभव झाल्याने तिने टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती मिळत आहे.

धक्कादायक! दंगल गर्ल बबिता फोगाटच्या बहिणीची आत्महत्या; कुस्तीत पराभव झाल्याने उचललं टोकाचं पाऊल

कुस्तीच्या अंतिम सामन्यात झालेला पराभव ती स्वीकारू शकली नाही. त्यामुळे तिने सोमवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शवविच्छेदनानंतर पोलिसांनी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. संबंधित महिला कुस्तीपटू गेल्या अनेक वर्षांपासून आपले महाबीर पैलवानच्या यांच्या घरी कुस्तीचा सराव करत होती. बबीता फोगाटच्या 17 वर्षीय मामे बहिणीचं नाव रितिका असं आहे.  ती राजस्थानच्या झंझनू जिल्ह्यातील जैतपूर या गावातील रहिवासी आहे. मृत रितिका द्रोणाचार्य पुरस्कार विजेते महाबीर पैलवान यांच्या कुस्ती अ‍ॅकॅडमीत गेल्या अनेक वर्षांपासून सराव करत होती. काही दिवसांपूर्वी रितिकाने भरतपूरच्या लोहागड स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय उप-कनिष्ठ, कनिष्ठ महिला आणि पुरुष कुस्ती स्पर्धेत भाग घेतला होता. यावेळी अंतिम सामन्यात रितिकाला एका गुणाने पराभव पत्करावा लागला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश