"सूनेला दुसऱ्या कोणासोबत तरी...", मानव शर्माला दिलेली धमकी; वडिलांनी मांडली व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 16:05 IST2025-03-01T16:03:14+5:302025-03-01T16:05:07+5:30

कुटुंबीयांचा आरोप आहे की, मानवचा मानसिक छळ केला जात होता.

agra case father reveals shocking details about manav sharma death | "सूनेला दुसऱ्या कोणासोबत तरी...", मानव शर्माला दिलेली धमकी; वडिलांनी मांडली व्यथा

"सूनेला दुसऱ्या कोणासोबत तरी...", मानव शर्माला दिलेली धमकी; वडिलांनी मांडली व्यथा

आग्रा येथील टीसीएस मॅनेजर मानव शर्मा याच्या आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासे होत आहेत. कुटुंबीयांचा आरोप आहे की, मानवचा मानसिक छळ केला जात होता. आत्महत्या करण्यापूर्वी मानवने एक व्हिडीओ बनवला होता ज्यामध्ये त्याने अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. मानवचे वडील एअरफोर्समधून रिटायर्ड झाले आहेत. त्यांनी सांगितलं की, सुनेला दुसऱ्या कोणासोबत तरी राहायचं होतं आणि तिने कुटुंबाला खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकीही दिली होती.

२४ फेब्रुवारी रोजी २८ वर्षीय मानव शर्माने व्हिडीओ बनवून आत्महत्या केली. मानव शर्मा मुंबईतील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) मध्ये रिक्रूटमेंट मॅनेजर म्हणून काम करत होता. आत्महत्या करण्यापूर्वी, मानवने एक व्हिडीओ रेकॉर्ड केला ज्यामध्ये त्याने त्याच्या पत्नीने केलेल्या छळाबद्दल सांगितलं.

व्हिडिओमध्ये मानव रडत रडत म्हणतो की, सॉरी मम्मी, सॉरी पापा, मी जात आहे. पुरुषही खूप एकटे असतात, कोणीतरी त्यांचाही विचार करायला हवा... मी आधीही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे, पण आता मला ते सहन होत नाही. व्हिडिओमध्ये मानवने त्याच्या पत्नीवर गंभीर आरोप केले आहेत.

मानवचे वडील नरेंद्र शर्मा यांनी सांगितलं की, त्यांच्या मुलाचं लग्न ३० जानेवारी २०२४ रोजी बरहन येथे झाले. लग्नानंतर सून मानवसोबत मुंबईला गेली. काही दिवस सगळं ठीक होतं, पण नंतर भांडणं वाढू लागली. ती दररोज भांडू लागली आणि कुटुंबाला खोट्या प्रकरणांमध्ये अडकवण्याची धमकी देऊ लागली. त्याने सांगितलं की, सून तिच्या एका मित्रासोबत राहू इच्छित होती.

मानवच्या बहिणीने आज तक आणि इंडिया टुडेला सांगितलं की, तिच्या भावाच्या आत्महत्येचे कारण केवळ त्याच्या तिच्या वहिनीचे प्रेमसंबंध नव्हते तर घटस्फोटाचे गुंतागुंतीचे कायदेशीर पैलू देखील होते. जानेवारी २०२५ मध्ये माझ्या भावाला समजलं की वहिनीचे दुसऱ्या कोणाशी तरी संबंध आहेत.

एका महिलेने मानवला याबद्दल माहिती दिली होती. जेव्हा मानवला हे सर्व कळले तेव्हा त्याने त्याच वेळी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यानंतर, मानवचे पालक मुंबईला गेले आणि त्यांनी दोघांनाही ही बाब समजावून सांगितली. मग परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेण्यात आला, पण जेव्हा मानवला कळलं की घटस्फोट घेणे सोपे नाही, तेव्हा तो तणावात आला.

२३ फेब्रुवारी २०२५ रोजी मानव आणि त्याची पत्नी मुंबईहून आग्र्याला आले. दुसऱ्या दिवशी घटस्फोटाच्या प्रक्रियेसाठी त्यांना वकिलाला भेटायचं होतं, पण मानवच्या पत्नीने मानवला तिच्या पालकांच्या घरी बोलावलं. तिथे, सासरच्यांनी मानवला धमकावले आणि घटस्फोट घेणं सोपं होणार नाही असं सांगितलं. वडील नरेंद्र शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा मानव आपल्या पत्नीला सोडायला गेला तेव्हा त्याच्या सासरच्या लोकांनी त्याला तिथे धमकावलं. दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजता त्याने गळफास घेतला.
 

Web Title: agra case father reveals shocking details about manav sharma death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.