वेश्यागमनासाठी आणलेल्या ४ मुलींची सुटका करून दलालास अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 21:35 IST2021-04-05T21:33:48+5:302021-04-05T21:35:06+5:30
Prostitution Case : नवघर पोलीस ठाण्यात त्याच्यावर पिटा कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वेश्यागमनासाठी आणलेल्या ४ मुलींची सुटका करून दलालास अटक
मीरारोड - भाईंदरच्या गोल्डन नेस्ट जवळील जय जलाराम काठियावाडी ढाबा येथे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेच्या पथकाने सापळा रचून एका दलालास अटक केली आहे . त्याने वेश्यागमनासाठी आणलेल्या ४ पीडित मुलींची सुटका करण्यात आली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपत पाटील यांनी खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी पाटील, ढेमरे, निलंगे, यंबर ह्या पोलीस कर्मचाऱ्यांसह सापळा रचून मुली घेऊन आलेल्या राजा उर्फ सरवर अख्तर हुसेन ( ४५ ) रा . नफीस इमारत, रावजी नगर, भिवंडी ह्या दलालास अटक केली. तो मूळचा उत्तर प्रदेशचा आहे. पैसे घेऊन तो ग्राहकांना मुली पुरवत असे. नवघर पोलीस ठाण्यात त्याच्यावर पिटा कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.