शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

दुपारी शालकाला भेटला अन् सांयकाळी तरुणाने गळफास घेतला, पाय जमिनीला टेकल्याने शंका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2021 21:48 IST

Crime News: गणेश यांनी आत्महत्या का केली याचे कारण समजू शकलेले नाही, मात्र मयताचे पाय जमिनीला टेकले जात असल्याने या घटनेविषयी शंका व्यक्त केली जात आहे.

जळगाव - तांबापुरातील गौतम नगरातील रहिवाशी गणेश रामदास अहिरे (वय ४०) या तरुणाने मेहरुण तलाव परिसरात कडूलिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेतल्याची घटना शनिवारी सायंकाळी उघडकीस आली. गणेश यांनी आत्महत्या का केली याचे कारण समजू शकलेले नाही, मात्र मयताचे पाय जमिनीला टेकले जात असल्याने या घटनेविषयी शंका व्यक्त केली जात आहे.

दुपारी शालकाला भेटल्यानंतर सायंकाळी गणेशने गळफास घेतला.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश अहिरे खासगी वाहनावर चालक म्हणून कामाला होते. शनिवारी रामदेववाडी (ता.जळगाव) येथे पैसे घ्यायला जायचे आहे, असे सांगून ते दुपारी शालकाकडून गेले. सायंकाळी पाच वाजता गणेश यांचे गळफास घेतल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. शालक प्रवीण चंद्रकांत वाघ याच्याही मोबाईलच्या व्हाटसॲप गृपवर हे फोटो आल्याने त्याने घटनास्थळी धाव घेतली. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सुनील सोनार व शुध्दोधन ढवळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन गणेश यांना जिल्हा रुग्णालयात हलविले. वैद्यकिय अधिकारी डॉ.सचिन अहिरे यांनी त्यांना मृत घोषीत केले.

दुपारी शालकसोबत गप्पागणेश हे दुपारी शालक प्रवीण वाघ याच्या घरी गेले होते. तेथे दोघं व इतर गप्पांमध्ये रंगल्या होत्या. हसतखेळत वातावरणात त्यांनी दीड वाजता घरातून पाय काढला. रामदेववाडी येथे पैसे घ्यायला जायचे आहे असे त्यांनी सांगितले. सायंकाळी मृतदेहच आढळला. अवघ्यात तीन ते चार तासात असं नेमकं काय घडले की, गणेशला आत्महत्या करावी लागली. मयताचे पाय जमिनीला टेकलेले होते, त्यामुळे खरच आत्महत्या आहे की घातपात याविषयी शंका व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी झाडाखाली दारुची बाटली, आगपेटी व चप्पल आढळून आली. खिशात मोबाईल, पाकीट व चाव्या होत्या. गणेश नेमका कशाने रामदेववाडी गेला, की गेलाच नाही हे देखील स्पष्ट झालेले नाही.मात्र पोलीस कारणाचा शोध घेत आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी मंगला व मुलगा चेतन असा परिवार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी