शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

मुकेश अंबानी यांचा फेक व्हिडिओ पाहून शेअर बाजारात पैसा लावला, मुंबईच्या महिला डॉक्टरला लाखो रुपयांचा चुना लागला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2024 11:48 IST

मुकेश अंबानी यांच्या डीप फेक व्हिडिओच्या सहाय्याने ही फसवणूक करण्यात आली आहे...

मुंबईंतील अंधेरी येथे एका 54 वर्षांच्या महिला आयुर्वेद डॉक्टरसोबत 7 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, मुकेश अंबानी यांच्या डीप फेक व्हिडिओच्या सहाय्याने ही फसवणूक करण्यात आली आहे. इंस्टाग्रामवरील या व्हिडिओमध्ये ते 'राजीव शर्मा ट्रेड ग्रुप' संदर्भात बोलताना दिसत आहेत. या फेक व्हिडिओमध्ये अंबानी, लोकांना अधिक परताव्यासाठी या कंपनीची बीसीएफ इंव्हेस्टमेंट अॅकेडमी ज्वॉइन करा, असे सांगताना दिसत आहेत.

मुंबईच्या डॉक्टर केके एच पाटिल यांच्यासोबत ही फसवणूक 28 मे ते 10 जून दरम्यान झाली. या कालावधीत त्यांनी 16 वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये एकूण 7 लाख रुपये पाठवले. यानंतर त्यांना अधिक परतावा आणि अंबानींकडून प्रमोशनचे अमिश देण्यात आले.

महिला डॉक्टरला अशी आली फसवणुकीची शंका - माध्यमांतील वृत्तांनुसार, संबंधित महिला डॉक्टरला 7 लाख रुपये गमावल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. ट्रेडिंग वेबसाइटवर त्यांना 30 लाख रुपयांचा नफा झाल्याचे दिसत होते. मात्र, त्यांना पैसे काढता येत नव्हता. यामुळे त्यांना फसवणूक झाल्याचा संशय आला. यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात एफआयआर दाखल केला आहे. या फसवणुकीसाठी गुंडांनी डीपफेक तंत्रज्ञानाचा वापर केल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. याप्रकरणी पोलिस बँकेच्या नोडल अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. संबंधित महिलेने ज्या बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर केले होते ते खाते बंद करण्यात आले आहे.

मुकेश अंबानी यांचा असा दुसरा व्हिडिओ... -खरे तर, हा मुकेश अंबानी यांचा अशा प्रकारचा दुसरा डीप फेक व्हिडिओ आहे. यापूर्वी, मार्च महिन्यात त्यांचा असाच एक व्हिडिओ समोर आला होता. या व्हडिओमोध्ये ते स्टॉक ट्रेडिंग मेंटरशिप प्रोग्रॅमसंदर्भात बोलताना दिसत होते. हा व्हडिओ एआयच्या सहाय्याने तयार करण्यात आला होता. यात, लोकांनी 'स्टूडन्ट विनिट' पेज फॉलो करायला हवे. येथे इंटरनेट यूजर्सना मोफत इंव्हेस्टमेंट अॅडव्हाइस मिळू शकते, असे सांगण्यात आले होते.

 

टॅग्स :fraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीMukesh Ambaniमुकेश अंबानीdoctorडॉक्टरPoliceपोलिसshare marketशेअर बाजार