लग्नाच्या 2 दिवसांनी बॉयफ्रेंडने नववधूला सासरच्या घरातून नेले पळून; नवऱ्याला दिली धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2023 16:49 IST2023-04-08T16:48:52+5:302023-04-08T16:49:32+5:30
प्रेयसीचे लग्न झाल्यानंतर प्रियकर त्याच्या मित्रांसह प्रेयसीच्या सासरच्या घरी पोहोचला आणि तिला धमकावून सोबत घेऊन गेला.

लग्नाच्या 2 दिवसांनी बॉयफ्रेंडने नववधूला सासरच्या घरातून नेले पळून; नवऱ्याला दिली धमकी
मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेयसीचे लग्न झाल्यानंतर प्रियकर त्याच्या मित्रांसह प्रेयसीच्या सासरच्या घरी पोहोचला आणि तिला धमकावून सोबत घेऊन गेला. प्रेयसीने सासरच्यांना सांगितले की, मुलीचे लग्न तुमच्या मुलाशी तिच्या संमतीशिवाय केले आहे. माझे आणि मुलीचे आधीच मंदिरात लग्न झाले आहे. या घटनेची परिसरात आता जोरदार चर्चा रंगली आहे.
3 एप्रिल रोजी शिवपुरी येथील एका तरुणाची वरात मुरैना जिल्ह्यातील सहसराम गावात गेली होती. 4 एप्रिल रोजी नववधूला घेऊन नातेवाईक शिवपुरीत आले. त्यानंतर 6 एप्रिल रोजी वधूचा प्रियकर नीरज धाकड हा त्याच्या मित्रांसह शिवपुरीत आला.नीरजने एकच गोंधळ घातला. प्रेयसीला सोबत घ्यायला आलो आहे, असे सांगू लागला. प्रेयसीच्या पतीने आणि सासरच्या लोकांनी विरोध केला असता नीरजने त्यांना धमकावले.
माझे आणि मैत्रिणीचे आधीच मंदिरात लग्न झाले आहे असे सांगितले. नीरज पुढे म्हणाला की, प्रेयसीच्या वडिलांनी बळजबरीने तिचे येथे लग्न लावून दिले. हा विवाह तिच्या संमतीशिवाय झाला आहे. आम्हा दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. तिलाही माझ्यासोबत जायचे आहे. म्हणूनच मी तिला सोबत घेऊन जात आहे. नीरज त्याच्या साथीदारांसह शिवपुरीला पोहोचला होता. तो मुलीला घेऊन जाऊ लागला असता, सासरच्या मंडळींनी त्याला विरोध केला.
नीरजने धमकावत थांबवू नका असे सांगितले. अन्यथा काहीतरी अनर्थ घडेल. या प्रकारावर सर्वांनीच माघार घेतली आणि नीरज आपल्या प्रेयसीला गाडीत घेऊन गेला. या घटनेबाबत सासरच्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी अधिक माहिती घेतली जात असल्याचे शिवपुरीचे एसपी रघुवंश सिंह भदौरिया यांनी सांगितले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतटचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"