ज्योती मल्होत्राच्या अटकेनंतर सोशल मीडियावर अनेक अफवा पसरत आहेत. पण आता हिसार पोलिसांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योती मल्होत्राने कोणत्याही पाकिस्तानी अधिकाऱ्याशी लग्न केल्याचा किंवा धर्म परिवर्तन केल्याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही. तिचा कोणत्याही दहशतवादी संघटनेशी थेट संबंध असल्याचा कोणताही पुरावा नाही. मात्र ती निश्चितच पाकिस्तान ऑपरेटिव्ह एजन्सी (POI) शी संबंधित लोकांच्या संपर्कात होती.
पोलिसांनी ज्योतीचे तीन मोबाईल, एक लॅपटॉप आणि काही इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणं जप्त केली आहेत. तिची चौकशी अजूनही सुरू आहे. हिसार पोलिसांनी ज्योती मल्होत्रा प्रकरणातील अफवांना पूर्णविराम दिला आहे. ज्योती मल्होत्राची कोणतीही डायरी त्यांच्याकडे नाही आणि तिचा कोणत्याही दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही.
"माझ्याकडे पैसे नाहीत..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांनी सरकारकडे केली 'ही' मोठी मागणी
ज्योतीने पाकिस्तानी गुप्तचर संस्थेशी संबंधित दानिशशी संपर्क साधला होता आणि लग्नाबाबत चर्चा करत होती. पाकिस्तानी नागरिकाशी लग्न करण्याबाबत अद्याप कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही. पोलीस आता ज्योतीच्या ऑनलाईन अकाऊंट्सवर फोकस करत आहेत. ज्योतीने कधी, कुठे आणि कोणत्या माध्यमातून पाकिस्तानशी संपर्क साधला हे शोधण्यासाठी तिचे सोशल मीडिया अकाउंट्स, ईमेल आणि मेसेजिंग एप्स तपासत आहेत.
"ती गुप्तहेर नाही, फक्त एक..."; पाकिस्तानी बहीण हिरा बतूलने घेतली ज्योती मल्होत्राची बाजू
४ वेळा मुंबईला गेलेली ज्योती मल्होत्रा; गर्दीच्या ठिकाणांचे फोटो आणि व्हिडीओ कोणाला पाठवले?
ज्योतीच्या फोन आणि लॅपटॉपमधून पोलिसांना अद्याप असा कोणताही डेटा सापडलेला नाही. पण पोलीस अजूनही त्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत जेणेकरून संपूर्ण सत्य समोर येईल. हरियाणातील रहिवासी असलेली लोकप्रिय युट्यूबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. ज्योतीची पाकिस्तानी बहीण हिरा बतूल पुन्हा एकदा तिचं समर्थन करण्यासाठी पुढे आली आहे. हिराने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने "ज्योती फक्त एक ट्रॅव्हल ब्लॉगर आहे, गुप्तहेर नाही" असं म्हटलं आहे.