शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 15:08 IST

चोराला त्याच्या चोरीबद्दल शिक्षा ठोठावायची की चोरीच्या पैशाने तो करत असलेल्या कामाबद्दल त्याची प्रशंसा करायची हेच समजत नाही. 

अनेकदा आपण पाहिलं असेल की, जेव्हा एखादा चोर पकडला जातो तेव्हा असं दिसून येतं की चोरीचे पैसे वापरून तो खूप ऐशोआरामात जगला आणि त्याने अनेक अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च केले. पण कधीकधी अशा घटना समोर येतात ज्या बरोबर आणि चूक यातील रेषा पुसट करतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. चोराला त्याच्या चोरीबद्दल शिक्षा ठोठावायची की चोरीच्या पैशाने तो करत असलेल्या कामाबद्दल त्याची प्रशंसा करायची हेच समजत नाही. 

२६० हून अधिक गुन्हे

कर्नाटकातील कलबुर्गी येथून एक अजब घटना समोर आली आहे. अशोक नगर पोलिसांनी एका चोराला अटक केली आहे. ज्याचे नाव शिवप्रसाद आहे. असं म्हटलं जात आहे की, पकडलेला चोर हा मोठा चोर आहेच पण तो एक धार्मिक व्यक्ती देखील आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, शिवप्रसादवर चोरीचे २६० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर बरेच गुन्हे दाखल आहेत. परंतु तो इतर चोरांपेक्षा वेगळा आहे कारण त्याची पैसे वापरण्याची पद्धत.

चोरीच्या पैशाचा गरजुंसाठी केला वापर

शिवप्रसादने चोरीच्या पैशाचा वापर मंदिरांमध्ये भंडारा आयोजित करण्यासाठी, रुग्णालयांमध्ये रुग्णांपर्यंत अन्न पोहोचवण्यासाठी आणि धार्मिक संस्थांना लाखो रुपये दान करण्यासाठी केला. अशा चांगल्या कर्मांमुळे त्याचं पाप धुतलं जाईल असा त्याचा विश्वास होता. या संदर्भात कलबुर्गी पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, तो मोठ्या घरांना टार्गेट करायचा, नंतर त्याला मिळालेल्या पैशातून आणि दागिन्यांमधून तो गरिबांना जेवण द्यायचा आणि मंदिरांमध्ये भंडाऱ्याचं आयोजन करायचा. 

कशी करायचा चोरी?

शिवप्रसादची चोरी करण्याची पद्धतही थोडी वेगळी आहे. रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, प्रत्येक चोरीपूर्वी, तो बोटांचे ठसे राहू नयेत म्हणून त्याच्या बोटांवर फेविक्विक किंवा फेविकॉल लावत असे. या हुशारीमुळे तो वर्षानुवर्षे पकडला गेला नाही.

४१२ ग्रॅम सोनं जप्त

मिळालेल्या माहितीनुसार, शिवप्रसादकडून ४१२ ग्रॅम सोनं आणि ३० लाखांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. त्याने एका मोठ्या मंदिराला ५ लाख रुपये दान केले आणि भंडाऱ्याचं आयोजन करून त्यामध्ये हजारो लोकांना जेवण दिलं होतं. चोराच्या या चांगल्या कामामुळे काही लोक त्याचं भरभरून कौतुक करत आहेत. चोराने लोकांचं मन जिंकलं आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरीThiefचोर