झाशी येथील केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (CGST) विभागातील डेप्युटी कमिशनर प्रभा भंडारी यांना लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. सीबीआयने (CBI) आता अधिक कडक पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. प्रभा भंडारी यांच्यासह इतर अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी सुरू झाली असून, त्यांचे कारनामे एकामागून एक समोर येत आहेत. व्यापाऱ्यांच्या ठिकानांवर छापे टाकल्यानंतर हे अधिकारी आपला खरा 'खेळ' सुरू करायचे. लाचेच्या देवाणघेवाणीसाठी व्यापाऱ्यांना थेट स्वतःच्या घरी बोलावून व्यवहार पक्का केला जात असे.
सीबीआय आता या अधिकाऱ्यांविरुद्ध उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता जमवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून सखोल तपास करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अधिकाऱ्यांनी काळ्या कमाईतून दिल्ली आणि ग्वाल्हेरमध्ये काही बेनामी मालमत्तांमध्ये गुंतवणूक केल्याची शक्यता आहे. डेप्युटी कमिशनर प्रभा भंडारी आणि दोन अधीक्षक अनिल कुमार तिवारी व अजय कुमार शर्मा यांच्या घरातून जप्त केलेल्या कागदपत्रांच्या आधारे सीबीआय पुढील तपास करत आहे. या अधिकाऱ्यांच्या एकूण मालमत्तेचा तपशील गोळा केला जात आहे.
७० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं
या प्रकरणात सीबीआय 'जय अंबे प्लायवूड'चे मालक लोकेश तोलानी आणि 'जय दुर्गा प्लायवूड'चे मालक तेजपाल मंगतानी यांच्या शोधात आहे. सीबीआयने ३० डिसेंबर रोजी प्रभा भंडारी यांच्यासह सात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. सीबीआय लखनौच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या १.५ कोटी रुपयांच्या लाच प्रकरणात आतापर्यंत प्रभा भंडारींसह पाच जणांना अटक करून जेलमध्ये पाठवलं आहे. आरोपींना ७० लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलं होतं.
असा चालायचा वसुलीचा खेळ
१८ डिसेंबर रोजी सीजीएसटीच्या पथकांनी जय दुर्गा हार्डवेअर आणि जय अंबे प्लायवूडच्या ठिकाणांवर छापे टाकले होते. त्यानंतर करचोरीमध्ये सवलत देण्याच्या बदल्यात मोठी रक्कम वसूल करण्याची डील सुरू झाली. अधिकाऱ्यांनी फर्मचे मालक आणि त्यांचे वकील नरेश कुमार गुप्ता यांना आपल्या घरी बोलावून पैशांचा व्यवहार केला होता. यापूर्वी इतर कंपन्यांवर टाकलेल्या छाप्यांच्या संदर्भातही आता गुप्तपणे चौकशी केली जात आहे. सीबीआयने झांसी, ग्वाल्हेर आणि दिल्लीतील ठिकाणांवर केलेल्या छापेमारीत ९० लाख रुपये रोख, मालमत्तेची कागदपत्रे, दागिने आणि चांदीच्या विटा जप्त केल्या आहेत.
पतीच्या नावावर महागडा प्लॉट
मिळालेल्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेला एक फ्लॅट प्रभा भंडारी आणि त्यांच्या पतीच्या नावावर असल्याचं सांगितले जात आहे. सीबीआय आता त्यांच्या बँक खात्यांची आणि मालमत्तेची झाडाझडती घेत आहे. १८ डिसेंबर रोजी जय अंबे प्लायवूड आणि जय दुर्गा हार्डवेअरवर पडलेल्या धाडीनंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. कोट्यवधींची करचोरी पकडल्यानंतर, प्रकरण मिटवण्यासाठी आणि कर कमी करून ५० लाख करण्यासाठी १.५ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.
Web Summary : CGST Deputy Commissioner Prabha Bhandari was arrested for accepting bribes. Post-raids, deals occurred at her home. CBI investigates disproportionate assets, uncovering Delhi and Gwalior investments. She demanded bribes from plywood owners, and raids revealed cash, property papers, and jewelry.
Web Summary : CGST उपायुक्त प्रभा भंडारी रिश्वत लेते गिरफ्तार। छापेमारी के बाद घर पर सौदे होते थे। सीबीआई ने आय से अधिक संपत्ति की जांच की, दिल्ली और ग्वालियर में निवेश का खुलासा। प्लाईवुड मालिकों से रिश्वत मांगी, छापे में नकदी, संपत्ति के कागजात और गहने मिले।