शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर बाळासाहेब ठाकरेंची विटंबना, तुम्हाला जबर किंमत मोजावी लागेल; संजय राऊतांचा हल्लाबोल
2
Gautami Patil: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले... (Video)
3
अमेरिकेने दाढी ठेवण्यावर बंदी घातली, शीख सैनिकांमध्ये चिंता; मुस्लिम आणि यहुदींवरही परिणाम
4
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
5
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
6
कॅश ऑन डिलिव्हरीवर एक्स्ट्रा चार्ज मागितला तर कारवाई होणार, बंपर सेलदरम्यान सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये
7
Tarot Card: येत्या आठवड्यात प्रवास योग आणि आप्तेष्टांच्या भेटी सुखावतील; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
8
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
9
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
10
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे
11
Step UP SIP: मुलांचं शिक्षण होऊ शकतं फ्री, तरीही वाचू शकतात ५० लाख रुपये; 'हा' प्लान टेन्शनला करेल बाय-बाय
12
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
13
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
14
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
15
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
16
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
17
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
18
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
19
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
20
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 

ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 08:26 IST

वसीम अकरमने सिव्हिल इंजिनिअरींगचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्याला व्हिसा पाहिजे होता, तेव्हा तो पहिल्यांदा जाळ्यात अडकला

चंदीगड - हरियाणाच्या पलवल पोलिसांनी २ जणांना पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. त्यातील एक वसीम अकरम आणि दुसरा तौफीक आहे. हे दोघेही युट्यूबर असून तपासात हे पाकिस्तानी उच्चायोगासोबत मिळून हेरगिरीचं नेटवर्क चालवत असल्याचं समोर आले. यावर्षीच्या सुरुवातीला प्रसिद्ध युट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक केल्यानंतर हेरगिरीचं प्रकरण चर्चेत आले. याआधी मलेरकोटलाच्या गुजाला, यामीन आणि अमन यामध्येही हेच पॅटर्न समोर आले आहेत. 

पाकिस्तानी उच्चायोग केवळ व्हिसा देण्याचं काम करत नाही तर ते भ्रष्टाचार आणि हेरगिरीसाठी शस्त्र बनलं आहे हे स्पष्ट होऊ लागले आहे. पलवलमध्ये पकडलेले वसीम आणि तौफीक लोकांकडून पैसे घेऊन त्यांना पाकिस्तानी व्हिसा देण्याचं आश्वासन देत होते. जे पैसे ते कमवायचे, त्यातील मोठा हिस्सा पाकिस्तानी उच्चायोगातील अधिकाऱ्यांना देत होते. दानिश नावाचा कर्मचारी हे पैसे आयएसआय एजेंटपर्यंत पोहचवायचा. हे एजेंट टूरिस्ट व्हिसावर भारतात यायचे आणि इथे राहून त्यांच्या हेरगिरीचं काम करायचे. 

वसीम अकरमने सिव्हिल इंजिनिअरींगचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्याला व्हिसा पाहिजे होता, तेव्हा तो पहिल्यांदा जाळ्यात अडकला. त्याचा व्हिसा रद्द झाला होता परंतु पाकिस्तानी हाय कमिशनमधील कर्मचारी जाफर उर्फ मुजम्मिल हुसैन याला २० हजारांची लाच दिल्यानंतर त्याला व्हिसा मिळाला होता. मे २०२२ मध्ये तो पाकिस्तानच्या कसूरला गेला होता. तिथून परतल्यानंतर तो जाफरसोबत व्हॉट्सअप संपर्कात होता. त्यानंतर त्याने पाकिस्तानी व्हिसा देण्याच्या नावाखाली लोकांकडून पैसे वसूल करण्याचं काम सुरू केले. त्याच्या खात्यात ४-५ लाख जमा झाले. त्यातील मोठी रक्कम जाफर आणि इतर कर्मचाऱ्यांना मिळत होती. पैशांशिवाय वसीम आणि तौफीक पाक एजेंटला सिम कार्ड, ओटीपी आणि भारतीय सैन्याशी निगडीत संवेदनशील माहिती शेअर करत होते.

पंजाब आणि हरियाणा येथे सैन्याच्या मोठमोठ्या छावण्या, एअरफोर्स स्टेशन, मिसाइल आणि डिफेन्स सिस्टम आहेत. त्यामुळे पाकिस्तान इथल्या परिसरातील अनेक लोकांना टार्गेट करते, जे लोक पाकिस्तानला फिरण्यासाठी येतात. त्यांना लालच, पैसे आणि व्हिसा मदतीच्या माध्यमातून ते भारताची हेरगिरी करण्यास भाग पाडतात. पाकिस्तानी उच्चायोगातील अधिकारी आधी लाच मागतात, त्यानंतर ते लोकांना हेरगिरीच्या जाळ्यात ढकलतात. त्यांच्याकडून सिमकार्ड, बँक अकाऊंट, ओटीपी, सैन्याशी निगडीत माहिती घेतात. त्या बदल्यात त्यांना पैसे देतात. ज्यावेळी हे नेटवर्क समोर आले तेव्हा भारताने जाफर आणि दानिश या दोघांना भारत सोडण्याचे आदेश दिले परंतु या अटकेतून पाकिस्तानी उच्चायोग केवळ व्हिसा देण्याचं काम करत नाही तर भारतात राहून हेरगिरीचं नेटवर्क उभे करण्याचा कट रचत आहेत हे समोर आले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Two More YouTubers Arrested for Espionage for Pakistan

Web Summary : Haryana police arrested two YouTubers for spying for Pakistan, linked to its High Commission. They allegedly took money for Pakistani visas, sharing profits with officials who aided ISI agents entering India on tourist visas to conduct espionage. The racket involved sharing sensitive military information.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPakistanपाकिस्तानIndiaभारत