शेतात विष पिऊन तो चालत गावात आला; भोलाण्याच्या तरुणाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 02:02 PM2021-03-11T14:02:30+5:302021-03-11T14:03:15+5:30

Crime News: नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोकुळ सुकदेव सपकाळे  हा आई वडीलांसह भोलाणे गावात वास्तव्याला होता. भोलाणे शिवारात त्याचे शेत असून शेती व मोलमजूरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवायचा.

After drinking poison in farm, he came in village; youth Suicide | शेतात विष पिऊन तो चालत गावात आला; भोलाण्याच्या तरुणाची आत्महत्या

शेतात विष पिऊन तो चालत गावात आला; भोलाण्याच्या तरुणाची आत्महत्या

googlenewsNext

जळगाव : तालुक्यातील भोलाणे येथे गोकुळ सुकदेव सपकाळे (वय २२) या तरुणाने विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. गोकुळ याने बुधवारी दुपारी शेतात काम करीत असताना विष घेतले व तसाच तो गावात आला. चुलत भावाला हा प्रकार समजल्यानंतर त्याला तातडीने जळगावातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. गुरुवारी पहाटे दोन वाजता त्याची मृत्यूशी झुंज संपली. त्याने आत्महत्या का केली याचे कारण अजून तरी समोर आलेले नाही.


नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोकुळ सुकदेव सपकाळे  हा आई वडीलांसह भोलाणे गावात वास्तव्याला होता. भोलाणे शिवारात त्याचे शेत असून शेती व मोलमजूरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवायचा. बुधवारी दुपारी  १.३० वाजेच्या सुमारास शेतात काम करत असतांना शेतासाठी लागणारे विषारी औषध गोकुळ सपकाळेने प्राशन केले. विषारी औषध घेतल्यानंतर तसाच तो गावात आला. चुलतभाऊ जगदीश सपकाळे याला त्याने आपण विषारी औषध घेतल्याचे सांगितले. त्याला तातडीने खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


गोकुळ याच्या पश्चात आई सुलाबाई, वडील सुकदेव सपकाळे, तुकाराम आणि मदन हे दोन मोठे भाऊ, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. दोन्ही मोठे भाऊ विवाहित असून कुटुंबासह ठाणे येथे राहतात. गोकुळ हा अविवाहित होता.
 

Web Title: After drinking poison in farm, he came in village; youth Suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.