Video: दारूच्या नशेत युवकाचं भान हरपलं, स्वत:च्या छातीवरच चाकू मारल्यानं मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2022 14:17 IST2022-03-19T14:17:16+5:302022-03-19T14:17:33+5:30
डिजेवर लागलेल्या गाण्याच्या तालावर डान्स करताना युवकाचे भान हरपले त्याने हातातील चाकूने स्वत:च्या छातीवर वार करण्याची एक्शन जीवावर बेतली.

Video: दारूच्या नशेत युवकाचं भान हरपलं, स्वत:च्या छातीवरच चाकू मारल्यानं मृत्यू
इंदूर – होळी आणि धुळवडीनिमित्त देशभरात सगळीकडे जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळत होतं. यावेळी मध्य प्रदेशातील इंदूर येथे धक्कादायक घटना घडली आहे. नेहमी स्टंट करण्याच्या नादात काहींचे इतके भान हरपते ज्यामुळे त्यांचा जीव जातो. इंदूरच्या बाणगंगा परिसरात याची प्रचिती पाहायला मिळाली. ज्याठिकाणी होळी दहनाच्या कार्यक्रमावेळी नशेत धुंद असलेल्या व्यक्तीने स्वत:वर चाकू मारल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.
नशेत धुंद असणारी तरूणांची टोळकी डान्स करत होती. तेव्हा एकाच्या हातात चाकू होता. डान्स करताना या युवकानं स्टंट करत चाकू स्वत:च्या छातीवर मारला. नशेत त्या युवकाचं भान इतकं हरपलं की तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर या युवकाच्या त्याच अवस्थेत हॉस्पिटलला उपचारासाठी नेले परंतु तिथे त्याचा मृत्यू झाला. बाणगंगा पोलिसांच्या मते, गुरुवारी मध्यरात्री ३ च्या सुमारास कुशवाह नगर येथे राहणारा ३८ वर्षीय गोपाळ नशेत धुंद होता. त्यावेळी तो त्याच्या मित्रांसोबत डीजेवर डान्स करत होता.
डिजेवर लागलेल्या गाण्याच्या तालावर डान्स करताना युवकाचे भान हरपले त्याने हातातील चाकूने स्वत:च्या छातीवर वार करण्याची एक्शन जीवावर बेतली. ३-४ वेळा छातीवर चाकू मारल्याने नशेत धुंद असलेला युवक गंभीर जखमी झाला. ज्यानंतर त्याच्या शरीरातून रक्त वाहू लागले. त्याच्यासोबत नाचणाऱ्या इतरांना कळेपर्यंत खूप उशीर झाला. जेव्हा त्यांना कळालं तेव्हा जखमी अवस्थेत युवकाला अरबिंदो रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र उपचारावेळी युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. डान्स करताना कुटुंबातील इतर सदस्य व्हिडीओ बनवत होते. तेव्हा हा सगळा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला.
दारूच्या नशेत डान्स करताना युवकाचं भान हरपलं, स्वत:वर चाकू मारल्याने झाला मृत्यू #MadhyaPradeshpic.twitter.com/AP9NipUe3N
— Lokmat (@lokmat) March 19, 2022
गोपाळ त्याची पहिली पत्नी आणि मुलगा आईवडिलांसह बाणगंगा परिसरात राहतो. होळी दहनाच्या कार्यक्रमाची सगळीकडे उत्साह पाहायला मिळत होता. परंतु यात गोपाळ आणि त्याच्या मित्रांनी प्रचंड दारू प्यायली होती. याच दारूच्या नशेत सर्व मुलं नाचत होती. परंतु गोपाळच्या हातातील चाकूनं त्याचा घात केला आणि नशेच्या धुंदीत त्याने स्वत:वर चाकू मारल्याने ही भयंकर घटना घडली. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.