डबल मर्डरनंतर गोळीबाराने मुंबईत खळबळ, दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 18:15 IST2020-04-23T18:13:16+5:302020-04-23T18:15:23+5:30
याप्रकरणी माहीम पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

डबल मर्डरनंतर गोळीबाराने मुंबईत खळबळ, दोघांना अटक
मुंबई - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून कोरोनाला अटकाव करण्यासाठी देशात लॉकडाऊन जारी केला आहे. दरम्यान, मुंबईतील शिवडीच्या दोन सख्ख्या भावांची हत्या करण्यात आली होती. ही घटना ताजी असताना माहिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा गोळीबार करण्यात आला. याप्रकरणी माहीम पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माहिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल रात्री ९ वाजताच्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना घडली. माहिमच्या वीर सावरकर मार्गावर जैतून कपांऊड या ठिकाणी गोळीबाराची घटना घडली. यावेळी रिझवान बेग या व्यक्तीने आसिफ नावाच्या एका व्यक्तीवर गोळीबार केला. रिझवान बेग हा माहिम दर्गा ट्रस्टी सोहील खंडवाणीचा निकटवर्तीय आहे. हा गोळीबार वैयक्तिक वैमनस्यातून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. तसेच याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.