शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

खळबळ! कोठडीत पिता-पुत्राच्या मृत्यूनंतर आता पोलिसांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2020 18:14 IST

१० मे रोजी कुमारसेन वीराकेरलामपुरडुर स्थानकात पोहोचले तेव्हा तेथे त्याला बेदम मारहाण करण्यात आली. कुमारसेनला मारहाण करून धमकी दिल्याचा आरोप पोलिसांवर ठेवण्यात आला आहे. त्याने हे कुणाला सांगितले तर संपूर्ण कुटुंबाला तुरुंगात डांबू असे धमकावले.

ठळक मुद्दे चालकाच्या वडिलांच्या तक्रारीनंतर या संपूर्ण घटनेत सामील उपनिरीक्षक आणि हवालदारांना निलंबित करण्यात आले आहे.या मारहाणीनंतर कुमारसेनची प्रकृती ढासळली असल्याचे सांगण्यात आले. १० जून रोजी श्वास न घेता आल्याने कुमारसेन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

तेनकासी - तमिळनाडूच्या तुतीकोरिनमध्ये पोलीस कोठडीत वडिलांचा आणि मुलाच्या मृत्यूच्या प्रकरणात अद्याप शमलेले नाही. तोवर तेनकासीमध्ये अशाच एका घटनेने लोक संतप्त झाले आहेत. तेनकासी जिल्ह्यात राहणाऱ्या २५ वर्षीय ऑटोरिक्षा चालकाला पोलिसांनी मारहाण केली. एका महिन्यापूर्वी ऑटोरिक्षाच्या चालकाला दोन पोलिसांनी लाठी-काठीने आणि लाथा - बुक्यांनी मारहाण केली, त्यानंतर चालकाची प्रकृती चिंताजनक असल्याचा आरोप आहे. चालकाच्या वडिलांच्या तक्रारीनंतर या संपूर्ण घटनेत सामील उपनिरीक्षक आणि हवालदारांना निलंबित करण्यात आले आहे.वीराकेरलामपुरडुर येथे राहणार्‍या नवनीतकृष्णन यांना तीन मुलगे होते. नवनीतकृष्णन यांनी सांगितले की. मालमत्तेवरून त्याचा मोठा मुलगा कुमारसेन यांचा सेनथिलशी वाद होता. संपत्तीच्या वादातून सेनथिल याने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर, ८ मे २०२० रोजी पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर यांनी कुमारसेन यांना पोलीस ठाण्यात बोलावले. पोलीस ठाण्यात चंद्रशेखरने कॉन्स्टेबल कुमार यांच्यासह कुमारसेन यांना जबर मारहाण केली असा आरोप आहे. ९ मे रोजी दुपारी कुमारसेन ऑटोरिक्षा स्टँडवर उभे होते, तेव्हा तिथे पोहोचलेल्या चंद्रशेखरशी त्यांचा वाद झाला.प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला बातचीतदरम्यान कुमारसेन यांनी उपनिरीक्षक चंद्रशेखर यांना सांगितले की, आपल्या दोघांची वर्दी खाकी आहे. चंद्रशेखरने कुमारसेनचा मोबाईल हिसकावून घेतला आणि दुसर्‍या दिवशी त्याला पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले. १० मे रोजी कुमारसेन वीराकेरलामपुरडुर स्थानकात पोहोचले तेव्हा तेथे त्याला बेदम मारहाण करण्यात आली. कुमारसेनला मारहाण करून धमकी दिल्याचा आरोप पोलिसांवर ठेवण्यात आला आहे. त्याने हे कुणाला सांगितले तर संपूर्ण कुटुंबाला तुरुंगात डांबू असे धमकावले.कुमारसेन यांनी डॉक्टरांना पोलिसांच्या मारहाणीबद्दल दिली माहिती या मारहाणीनंतर कुमारसेनची प्रकृती ढासळली असल्याचे सांगण्यात आले. १० जून रोजी श्वास न घेता आल्याने कुमारसेन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीदरम्यान डॉक्टरांनी सांगितले की, कुमारसेनच्या अंतर्गत शरीरात जखम आहे. कुमारसेनच्या मारहाणीचा किडनी आणि फुफ्फुसांसह अनेक ठिकाणी गंभीर परिणाम झाला होता.ज्या डॉक्टरांनी कुमाररासेनला जखमांबद्दल विचारले गेले, तेव्हा त्याने पोलिसांच्या दुष्कृत्याबाबत सांगितले. डॉक्टरांनी पोलिसांना याची माहिती दिली. काही दिवसांच्या उपचारानंतर अखेर कुमारसेनचा मृत्यू झाला.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

भारत-पाकिस्तान सीमेवर PMAYच्या घरासाठी खोदकाम सुरू होते; लोखंड पाहून मजुरांना घामच फुटला

 

नवऱ्याने टीव्ही दिला नाही म्हणून पत्नीने पोटच्या मुलांना विष पाजले; आत्महत्येचा प्रयत्न

 

सोयाबीन बोगस बियाणे प्रकरणी 'ईगल'वर फसवणुकीचा गुन्हा दाखल

 

थरारक! घरासमोर जाऊन टोळक्याने गुंडाची चाकू भोसकून हत्या 

 

TikTok स्टार शिवानीचा गळा दाबून खून; बेडच्या आत मिळाला मृतदेह

 

जे. जे. रुग्णालयात डॉक्टरचा वॉर्डबॉयने केला विनयभंग; पोलिसांनी केली अटक

 

मृत्यूशी झुंज देतेय! आजीच्या कुशीत झोपलेली नात; मामाच्या वासनेला बळी पडली

टॅग्स :PoliceपोलिसDeathमृत्यूTamilnaduतामिळनाडूsuspensionनिलंबन