रामपालनंतर आणखी काही सेलिब्रेटी एनसीबीच्या रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2020 03:16 IST2020-11-15T03:16:03+5:302020-11-15T03:16:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अभिनेता अर्जुन रामपालकडे केलेल्या चौकशीनंतर आणखी काही सेलिब्रिटी अमली पदार्थ नियंत्रण कक्षाच्या (एनसीबी) रडारवर ...

After arjun Rampal, some more celebrities are on the radar of NCB | रामपालनंतर आणखी काही सेलिब्रेटी एनसीबीच्या रडारवर

रामपालनंतर आणखी काही सेलिब्रेटी एनसीबीच्या रडारवर

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अभिनेता अर्जुन रामपालकडे केलेल्या चौकशीनंतर आणखी काही सेलिब्रिटी अमली पदार्थ नियंत्रण कक्षाच्या (एनसीबी) रडारवर आहेत. त्यांनाही लवकरच चौकशीसाठी बाेलावले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.


अर्जुन रामपालच्या घरी एनसीबीने मारलेल्या छाप्यात काही बंदी असलेली उत्तेजक औषधे सापडली. त्याबाबत त्याच्यासह त्याची दक्षिण आफ्रिकन गर्लफ्रेंड गॅब्रियला डेमेट्रियड्सकडे कसून चौकशी करण्यात आली. शुक्रवारी अर्जुनची तर त्यापूर्वी दोन दिवस गॅब्रियलची चाैकशी करण्यात आली. त्यांनी ड्रग्ज तस्करी व सेवनाचा इन्कार केला. मात्र तपास यंत्रणेने त्यांना क्लीन चिट दिलेली नाही. शिवाय गॅब्रियलचा भाऊ अंजिलियस ड्रग्ज तस्करीबद्दल अद्याप न्यायालयीन कोठडीत आहे. त्यामुळे त्याच्याकडे व अन्य तस्करांकडून मिळालेल्या माहितीतून अन्य काही सेलिब्रिटींची नावे समोर आली आहेत. त्यांच्याकडे लवकरच चौकशी करण्यात येणार असल्याचे समजते.


एनसीबीने आतापर्यंत अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविकसह जवळपास ३० जणांना अटक केली आहे. यातील अनेक जण मादक पदार्थांची तस्करी करणारे आहेत.

Web Title: After arjun Rampal, some more celebrities are on the radar of NCB