शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

२ कोटींच्या दरोड्यातील मुख्य सुत्रधार ४ वर्षांनी जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2019 11:59 IST

याप्रकरणी पोलिसांनी यापूर्वी ११ जणांना अटक केली होती़. मात्र, संजय गंभीर हा मुख्य सुत्रधार पोलिसांच्या हाती लागत नव्हता़.

पुणे : सेनापती बापट रोडवरील लाईफ जनरल इन्श्युरन्स कंपनीवर दरोडा टाकून २ कोटी रुपये चोरुन नेणाऱ्या टोळीच्या मुख्य सुत्रधाराला तब्बल ४ वर्षांनी पकडण्यात पुणेपोलिसांना यश आले आहे़. संजय चंद्रकांत गंभीर असे त्याचे नाव आहे़. याप्रकरणी पोलिसांनी यापूर्वी ११ जणांना अटक केली होती़. मात्र, संजय गंभीर हा मुख्य सुत्रधार पोलिसांच्या हाती लागत नव्हता़.

गुन्हे शाखेकडून पुणे शहरातील फरार आरोपींच्या शोधाकरिता सहायक पोलीस आयुक्त शिवाजी पवार यांच्या अधिपत्याखाली विशेष पथक स्थापन केले आहे़. या पथकातील पोलीस  नाईक महेश निंबाळकर यांना संजय गंभीर हा बाणेर रोडवरील सकाळनगरमधील हॉटेल चारुज येथे येणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरुन महेश निंबाळकर व संभाजी नाईक यांनी हॉटेल चारुजवर सापळा रचून त्याला पकडले़. चौकशीत त्याने गुन्हा कबुल केला.लाईफ जनरल इन्श्युरन्स अँड ब्रोकरेज या सेनापती बापट रोडवरील कंपनीचे मालक साईराम अय्यर यांनी कंपनीच्या कामासाठी मुंबईला ऑफिस घ्यायचे होते़. त्याच्या व्यवहारासाठी १ जून २०१५ रोजी २ कोटी रुपयांची रक्कम ऑफिसमध्ये आणली होती़. ऑफिसमधील सेल्स कर्मचारी मनोज एलपूर (रा़ पिंपरी) याला माहिती होती़. त्याने मित्रांच्या मदतीने ही रक्कम चोरीचा कट आखला़. ९ जून २०१५ रोजी सायंकाळी धाडसी दरोडा टाकून ऑफिसमधील १ कोटी ९७ लाखांची रोकड चोरुन नेली होती़. चतु:श्रृंगी पोलिसांनी मनोज एलपूर, चंद्रकांत बेलवटे(रा़. चिंचवड), अमित सांगळे (रा़. निगडी) व इतर आठ अशा ११ जणांना अटक केली होती़. दरोडा टाकल्यानंतर संजय गंभीर फरार झाला होता़. संजय गंभीर याच्यावर यापूर्वी बॅक ऑफ महाराष्ट्रकडे जप्त केलेल्या मालमत्ता निम्या किंमतीत मिळवून देतो, असे सांगून १० साथीदारांसह नागरिकांना २ कोटी रुपयांची फसवणूक केली होती़. याप्रकरणी २०१२ मध्ये त्याला अटक झाली होती़ याशिवाय २०११ मध्ये टेक महिंद्रा कंपनीमध्ये नोकरी लावून देतो, असे सांगून लोकांकडून पैसे धेऊन नोकरी न लावता फसवणूक केल्याबाबत गुन्हा दाखल आहे़.  या गुन्ह्यात संजय गंभीर गेली ९ वर्षे फरार आहे़. अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त बच्चनसिंग, सहायक पोलीस आयुक्त डॉ़. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक महेश निंबाळकर, संभाजी नाईक, महेश पवार यांच्या पथकाने केली आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसtheftचोरीArrestअटक