आदित्य पांचोली पुन्हा अडचणीत; मॅकेनिकने पैसे थकविल्याप्रकरणी केला गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 21:47 IST2019-01-21T21:30:25+5:302019-01-21T21:47:14+5:30
या प्रकरणी वर्सोवा पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद केली आहे.

आदित्य पांचोली पुन्हा अडचणीत; मॅकेनिकने पैसे थकविल्याप्रकरणी केला गुन्हा दाखल
मुंबई - अभिनेत्री जिया खान हत्या प्रकरणात अडकलेल्या अभिनेता सुरज पांचोलीचा आदित्य पांचोलीविरोधात मुलगा एका मॅकेनिकने वर्सोवा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार अर्ज दाखल केली आहे. अभिनेता आदित्य लॅण्ड क्रूझर गाडीच्या दुरूस्तीचे पैसे मॅकेनिकने मागितले असता आदित्यने त्याला धमकावून पैसे देण्यास नकार दिल्याचा आरोप त्याने तक्रारीत केला आहे. या प्रकरणी वर्सोवा पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद केली आहे.
जोगेश्वरी पश्चिम परिसरात एस.व्ही रोडवर तक्रारदार मोसीन राजपकर हे राहतात. मागील अनेक वर्षांपासून मोसीन हे आदित्य पांचोली यांना ओळखत असून पांचोलीच्या गाडीचे पूर्वीपासून काम मोसीन हे करत आहे. दरम्यान 10 मार्च 2017 रोजी आदित्यने मोसीनला फोन करून घरी बोलावून घेतले होते. मोसीन घरी आल्यानंतर आदित्यने त्याची एमएच 01 पीए 45 ही लॅण्ड क्रूझर गाडी बंद पडली असून ती दुरूस्त करण्यास सांगितले. तसेच दुरुस्तीचा जो काही खर्च आहे तो ही देण्याची कबूली दिली. गाडी पूर्णपणे बंद असल्यामुळे मोसीनने 12 मार्च 2017 रोजी गाडीचे काम हे पांचोलीच्या घराबाहेरच सुरू केले. 18 मार्च 2017 रोजी गाडी सुरू करून मोसीनने ती गाडी दुरूस्तीसाठी शांती मोटार्स गॅरेज जुहू कोळीवाडा येथे नेली. मात्र, त्या गाडीचे साहित्य मुंबईत मिळत नसल्यामुळे 17 जुलै 2017 रोजी ती गाडी मोसीनने ट्रान्सपोर्ट कंपनीच्या मदतीने दिल्लीला नेण्यात आली. 22 फेब्रुवारी 2018 रोजी गाडीचे काम पूर्ण करून ती गाडी मोसीनने पून्हा मुंबईत आणली. 23 फेब्रुवारी 2018 रोजी गाडी मोसीनने आदित्य पांचोलीच्या घरी सोडली. आदित्यची ही गाडी दुरूस्ती करण्यासाठी 2 लाख 85 हजार 158 रुपये इतका खर्च आला.
गाडी दुरुस्तीसाठी आलेला खर्च देण्यासाठी मोसीनने वारंवार आदित्य पांचोली यांच्याशी संपर्क साधला. मात्र, आदित्य पांचोलीने वेळोवेळी मोसीनला शिवीगाळ करत पैसे न देता मारण्याची धमकी दिल्याचे मोसीनने पोलिसांना दिलेल्या लेखी तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी आज दुपारी मोसीनने वर्सोवा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार नोंदवली असून पोलिसांनी आदित्य पांचोलीविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
Mumbai: Complaint registered against actor Aditya Pancholi at Versova Police Station by a car mechanic for allegedly threatening to kill him when he asked for a payment of car repair charges of Rs 2,82,158. Investigation underway. pic.twitter.com/T3uRIph7TM
— ANI (@ANI) January 21, 2019