पैसे दिले नाही म्हणून व्यसनी मुलाने घेतला गळफास लावून
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2018 22:06 IST2018-07-14T22:06:33+5:302018-07-14T22:06:52+5:30
याप्रकरणी चुनाभट्टी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद

पैसे दिले नाही म्हणून व्यसनी मुलाने घेतला गळफास लावून
मुंबई - अमली पदार्थाचे व्यसन जडलेल्या नवाब नझीर शाह (वय - २४) या तरुणाने वडिलांनी पैसे न दिल्याने रागाच्याभरात राहत्या घराच्या पोटमाळ्यावर ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी चुनाभट्टी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अमली पदार्थाचे भयंकर व्यसन असलेला नवाबला सुधारण्यासाठी पैसे दिले जात नव्हते. मात्र त्याने काल वडिलांकडे पैसे मागण्याचा तगादा लावला. तरीदेखील वडिलांनी पैसे न दिल्याने घराच्या पोटमाळ्यावर पंख्याला ओढणी बांधून गळफास लावून घेतला. कुर्ला पूर्वेकडे असलेल्या कसाईवाडा येथे नवाब यांचे घर आहे. तेथे हि घटना घडली. एका खोलीत स्वतःला कोंडून गळफास लावल्यानंतर तडफडणाऱ्या नवाबला वडील आणि भावाने बाजूच्या घरातून पोटमाळ्याला असलेले पार्टीशन तोडून पोटमाळ्यावरन नवाबला बाहेर काढून ताबडतोब रिक्षातून शीव रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. याप्रकरणी चुनाभट्टी पोलिसांना नवाबाच्या वडिलांना सर्व हकीकत सांगितली असून त्यांच्या आत्महत्येला प्रवृत्त करण्याप्रकरणी कोणावरही संशय नाही.