शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

ड्रग्जप्रकरणी अभिनेत्री दीपिका, सारा, श्रद्धा, रकुल यांचीही आता झाडाझडती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2020 6:49 AM

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे समन्स : धक्कादायक बाबी येणार समोर

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी आघाडीच्या अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत सिंग यांना चौकशीला पाचारण करण्यात येणार आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) त्यांना समन्स जारी केले असून दीपिकाला शुक्रवारी तर सारा, श्रद्धा यांना शनिवारी चौकशीसाठी बोलावले जाईल. तर रकुल प्रीत सिंग, सिमोन खंबाटा यांची चौकशी गुरुवारी केली जाणार आहे.

टॅलेंट मॅनेजर जया साहा हिच्याशी केलेल्या व्हॉटसअप चॅटमध्ये त्यांची नावे समोर आल्याने चौकशी केली जाणार असल्याचे एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले. या कलाकारांची कसून चौकशी केल्यास बॉलीवुडशी संबंधित अनेक धक्कादायक बाबी उघडकीस येण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे. सुशांत आत्महत्या ते ड्रग्ज रॅकेट अभिनेता सुशांतसिह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासातून बॉलीवूडमधील हे ड्रग्ज रॅकेट उघडकीस आले. या तपासादरम्यान घेतलेल्या जबाबातून या कलाकारांची नावे समोर आली आहेत.

टॅलेंट मॅनेजर जया साहाच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये नावे समोर आल्याने चौकशी२०१७ मध्ये पार्टीसाठी दीपिकाने मॅनेजरकडे केली होती ‘माल’साठी विचारणासारा अली खानने सुशांतसोबत ‘केदारनाथ’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. या शूटिंगदरम्यान ती गांजा घेत होती, अशी माहिती या प्रकरणात अटक केलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीने दिल्याचे समजते.श्रद्धा कपूर सीबीडी आॅईल घेत असल्याचा जबाब जया साहाने दिला आहे.रकुल प्रीत सिंग, सिमोन खंबाटा यांच्या सहभागाबाबत पुरावे मिळाले आहेत, असा दावा एनसीबीने केला आहे.या सर्वांकडे सविस्तर चौकशी केली जाणार आहे. त्यांना समन्स बजाविण्यात आले असून आवश्यकतेनुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे, असे एनसीबीचे उप संचालक केपीएस मल्होत्रा यांनी बुधवारी स्पष्ट केले.

टॅग्स :Deepika Padukoneदीपिका पादुकोणDrugsअमली पदार्थSara Ali Khanसारा अली खान