शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्री झरीन खानला वेश्या म्हटल्याने माजी मॅनेजरविरोधात पोलिसांत तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 18:14 IST

अंजली अथ असं या महिला आरोपीचं नाव आहे. याप्रकरणी खार पोलीस अधिक तपास करत असून पोलिसांनी अथ हिला पुढील चौकशीसाठी बोलावले आहे.  

ठळक मुद्देअंजली अथ झरीनसाठी मॅनेजर म्हणून काम करत होती. वेश्या म्हणून हिणवल्याने तिने तिच्या माजी मॅनेजरविरोधात खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल दोघींमध्ये एका व्यवहारावरून वाद सुरू होता

मुंबई - अभिनेत्री झरीन खानला वेश्या म्हणून हिणवल्याने तिने तिच्या माजी मॅनेजरविरोधात खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अंजली अथ असं या महिला आरोपीचं नाव आहे. याप्रकरणी खार पोलीस अधिक तपास करत असून पोलिसांनी अथ हिला पुढील चौकशीसाठी बोलावले आहे.  

अंजली अथ झरीनसाठी मॅनेजर म्हणून काम करत होती. मात्र,काही वर्षांनी अंजलीने झरीनच्या व्यवस्थापनाचं काम सोडल्यापासून दोघींमध्ये एका व्यवहारावरून वाद सुरू होते. वाद विकोपाला गेल्यानंतर झरीनला अंजलीचे कटाक्याचे भांडण झाले. या वादात अंजलीने झरीनला वेश्या म्हणून तिचे चारित्र्य हनन केले. या प्रकरणी गुरुवारी संध्याकाळी झरीनने खार पोलिस ठाण्यात अंजली विरोधात तक्रार नोंदवली. अंजलीसोबतचा करार संपल्यानंतर अंजलीने मला फोनवर धमकीचे आणि आक्षेपार्ह मेसेज पाठवले. माझ्याविषयी खोट्या बातम्या पसवरल्या. इतक्यावरच न थांबता तिने आपल्या नावाचा गैरवापर करून अंजलीने सिनेमासृष्टीतील लोकांकडून पैसे उकळले असे झरीनने पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. खार पोलीस ठाण्यात झरीन खानने अंजलीविरोधात भा. दं. वि. कलम ५०९(महिलेचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने शब्दोचार किंवा कृती करणे), ४४८, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप अंजली या आरोपी महिलेला अटक करण्यात आलेली नसल्याचे खार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. 

टॅग्स :MolestationविनयभंगbollywoodबॉलिवूडPoliceपोलिस