राज कुंद्रा प्रकरणात अभिनेत्री शर्लिन चोप्रा गुन्हे शाखेच्या रडारवर; बजावले समन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 08:23 PM2021-07-26T20:23:32+5:302021-07-26T20:24:44+5:30

Raj Kundra Case summons to Actress Sherlyn Chopra : मंगळवारी सकाळी 11 वाजता पॉर्नोग्राफीप्रकरणी तिचा जबाब नोंदवण्यासाठी गुन्हे शाखेने शर्लिनला बोलावले आहे.

Actress Sherlyn Chopra on the radar of the crime branch in the Raj Kundra case; Summons issued | राज कुंद्रा प्रकरणात अभिनेत्री शर्लिन चोप्रा गुन्हे शाखेच्या रडारवर; बजावले समन्स

राज कुंद्रा प्रकरणात अभिनेत्री शर्लिन चोप्रा गुन्हे शाखेच्या रडारवर; बजावले समन्स

Next
ठळक मुद्दे यापूर्वी रविवारी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने अभिनेत्री-मॉडेल गहाना वशिष्ठ हिच्यासह तीन जणांना चौकशीसाठी बोलावले होते.

राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणात नवीन खुलासे होत आहेत. यासह या प्रकरणात आणखी बरीच नावेही जोडली जात आहेत. दरम्यान, सोमवारी मुंबई गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने या प्रकरणात अभिनेत्री-मॉडेल शर्लिन चोप्रा हिला समन्स बजावले आहे. मंगळवारी सकाळी 11 वाजता पॉर्नोग्राफीप्रकरणी तिचा जबाब नोंदवण्यासाठी गुन्हे शाखेने शर्लिनला बोलावले आहे.

यापूर्वी रविवारी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने अभिनेत्री-मॉडेल गहाना वशिष्ठ हिच्यासह तीन जणांना चौकशीसाठी बोलावले होते. याआधी शुक्रवारी राज कुंद्राची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टीवरही गुन्हे शाखेने सहा तास चौकशी केली. त्याचबरोबर अश्लील प्रकरणातील मुख्य आरोपी राज कुंद्रा याला न्यायालयाने २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दररोज या प्रकरणात अनेक मोठे खुलासे होत आहेत. या प्रकरणातील धागेदोरे केवळ मुंबईशीच नव्हे तर कानपूरमध्येही जोडले गेले आहेत, ज्याची चौकशी केली जात आहे.

शर्लिन बर्‍याच वर्षांपासून नग्न व्हिडिओंसाठी काम करीत आहे - गहना वशिष्ठ
अश्लील चित्रपट बनवण्याच्या रॅकेटमध्ये अभिनेत्री गहाना वशिष्ठचे नावही समोर आले आहे. जेथे ती रविवारी न्यायालयात हजर होणार होती, पण ती दाखल झाली नाही. त्याचवेळी, गहनाने एका मुलाखतीत असेही सांगितले की, पूनम पांडे आणि शर्लिन चोप्रा गेल्या अनेक वर्षांपासून नग्न व्हिडिओंसाठी काम करत आहेत. त्यांना कोणीही जोरजबरदस्ती केलेली नाही. त्यामुळे त्यांचे सर्व आरोप खोटे आहेत. शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडे यांनी शिल्पा शेट्टी यांचे पती, उद्योगपती राज कुंद्रा याने अडल्ट चित्रपटसृष्टीत आणण्यात मुख्य हात असल्याचा आरोप केला आहे.

 

 

 

Web Title: Actress Sherlyn Chopra on the radar of the crime branch in the Raj Kundra case; Summons issued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app