ऑनलाइन मद्य खरेदीत अभिनेत्री शबाना आझमी यांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 07:46 AM2021-06-25T07:46:34+5:302021-06-25T07:47:03+5:30

आझमी यांनी ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी ऑनलाइन मद्य खरेदीसाठी आगाऊ पैसे दिले.

Actress Shabana Azmi cheated in buying liquor online pdc | ऑनलाइन मद्य खरेदीत अभिनेत्री शबाना आझमी यांची फसवणूक

ऑनलाइन मद्य खरेदीत अभिनेत्री शबाना आझमी यांची फसवणूक

Next

मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांची ऑनलाइन मद्याची खरेदी करताना फसवणूक झाली. याप्रकरणी त्यांनी अद्याप तक्रार केली नसून, गुरुवारी ट्विट करत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.

आझमी यांनी ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी ऑनलाइन मद्य खरेदीसाठी आगाऊ पैसे दिले. त्यांना होम डिलिव्हरी मिळणार हाेती. मात्र, ती मिळाली नाही. ज्या दुकानातून फोन आला होता त्या दूरध्वनी क्रमांकावर त्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो क्रमांक बंद होता. ‘मी ऑनलाइन पेमेंट फसवणुकीची बळी ठरले, इतरांनी याबाबत काळजी घ्यावी, अशा भामटेगिरीला फसू नये’, असे आवाहन त्यांनी ट्विटद्वारे केले. पैसे दिल्याचा स्क्रीन शॉट पोस्ट केला. जुहू पोलिसांना विचारले असता, अद्याप तक्रार करण्यात आली नसून, ती आल्यानंतर कायदेशीर कारवाई करू, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत माने यांनी दिली.

Web Title: Actress Shabana Azmi cheated in buying liquor online pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app