दिल्लीहून मुंबईला येणाऱ्या विमानात अभिनेत्रीसोबत छेडछाड; उद्योजकाला अटक!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 04:02 PM2021-10-20T16:02:31+5:302021-10-20T16:03:33+5:30

दिल्लीहून मुंबईला येणाऱ्या विमानात एका अभिनेत्रीसोबत छेडछाड केल्याच्या आरोपात गाझियाबादमधील एका उद्योजकाला अटक करण्यात आली आहे

actress molesting ghaziabad businessman arrest delhi mumbai flight maharashtra police | दिल्लीहून मुंबईला येणाऱ्या विमानात अभिनेत्रीसोबत छेडछाड; उद्योजकाला अटक!

दिल्लीहून मुंबईला येणाऱ्या विमानात अभिनेत्रीसोबत छेडछाड; उद्योजकाला अटक!

Next

दिल्लीहून मुंबईला येणाऱ्या विमानात एका अभिनेत्रीसोबत छेडछाड केल्याच्या आरोपात गाझियाबादमधील एका उद्योजकाला अटक करण्यात आली आहे. पीडित अभिनेत्रीनं पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार ३ ऑक्टोबर रोजी दिल्लीहून मुंबईत येत असताना विमान प्रवासात संबंधित व्यक्तीनं छेडछाड केल्याचा आरोप केला आहे. 

अभिनेत्रीच्या दाव्यानुसार, विमान मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताच जेव्हा ती तिची बॅग ओव्हरहेड स्टोरेजमधून बाहेर काढण्यासाठी उठली त्यावेळी संबंधित व्यक्तीनं चुकीच्या पद्धतीनं तिला स्पर्श केला. अभिनेत्रीनं तातडीनं याबाबत केबिन क्रूकडे तक्रार केली आणि त्या व्यक्तीलाही सुनावलं. केबिन क्रूनं संबंधित प्रकरणी अभिनेत्रीला पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास सांगितलं. त्यानंतर अभिनेत्रीनं वर्सोवा पोलीस ठाणे गाठलं तिथं पोलिसांनी तिला सहारा एअरपोर्ट पोलीस ठाण्यात जाण्यास सांगितलं. 

अभिनेत्रीचा संताप पाहून आरोपीनं मागितली माफी
अभिनेत्रीनं संताप व्यक्त करता आरोपीनं तिची माफी मागितली होती. याचीही पुष्टी केबिन क्रूनं केली आहे. विमानाच्या केबिन क्रूनंही अभिनेत्रीच्या तक्रारीची माहिती सहारा पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना दिली आहे. प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात झाल्यानंतर पोलिसांनी नितीन नावाच्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर सोमवारी आरोपीला अटक करण्यात आली आणि कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टानं आरोपीला तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे. आरोपीनं केबिन क्रूची दिशाभूल करण्यासाठी आपल्या नावाचा उच्चार देखील चुकीच्या पद्धतीनं केला होता, असंही चौकशीत निष्पन्न झालं आहे. त्यानं याआधी आपलं नाव राजीव असं सांगितलं होतं. 

केबिन क्रूनं दिलेल्या माहितीनुसार पोलिसांकडून सुरुवातीला राजीव नावाच्या व्यक्तीचा शोध घेतला जात होता. पण पोलिसांना संशय आल्यानंतर त्यादिवशी प्रवास केलेल्या सर्वच प्रवाशांची माहितीची तपासणी करण्यात आली. त्यानंतर आरोपीचं खरं नाव नितीन असल्याचं उघड झालं. नितीन याचा फोटो पोलिसांनी अभिनेत्रीला दाखवला आणि आरोपीची ओळख पटली. १४ ऑक्टोबर रोजी पोलिसांनी नितीन याला चौकशीसाठी बोलावलं. काही तासांच्या चौकशीनंतर पोलिसांनी नितीन याला अटक केली आहे. चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार नितीन गाझियाबादमधील एक मोठा उद्योजक असल्याची माहिती समोर आली आहे. व्यवसायासंदर्भात त्याचं मुंबईत येणं-जाणं असतं. 

Web Title: actress molesting ghaziabad businessman arrest delhi mumbai flight maharashtra police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app