महिला नेत्याने काढला प्रचारादरम्यान छेड काढणाऱ्या तरुणाच्या कानाखाली आवाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2019 19:10 IST2019-04-11T19:06:37+5:302019-04-11T19:10:38+5:30

यासंदर्भात अद्याप कोणताही गुन्हा नोंदवला गेला नाही

Actress Khushboo slaps youth at election campaign rally | महिला नेत्याने काढला प्रचारादरम्यान छेड काढणाऱ्या तरुणाच्या कानाखाली आवाज

महिला नेत्याने काढला प्रचारादरम्यान छेड काढणाऱ्या तरुणाच्या कानाखाली आवाज

ठळक मुद्देखुशबू शहरातील बंगलोर सेंट्रल काँग्रेसच्या उमेदवार रिझवान अरशद यांच्यासाठी काल प्रचार करत असताना ही घटना घडली. कर्नाटकातील लोकसभा निवडणुकांसाठी स्टार प्रचारकांपैकी खुशबू सुंदर या एक आहेत

बंगळुरू - बंगळुरूमध्ये काँग्रेसच्या प्रचार रॅलीदरम्यान काँग्रेसच्या नेत्या खुशबू सुंदर यांच्याशी एका तरुणाने गैरवर्तन केले. त्यावेळी त्या तरुणाच्या खुशबू यांनी कानशिलात लगावली आहे. खुशबू शहरातील बंगलोर सेंट्रल काँग्रेसच्या उमेदवार रिझवान अरशद यांच्यासाठी काल प्रचार करत असताना ही घटना घडली. 

खुशबू आपल्या वाहनाच्या जवळ जात असताना अचानक त्या मागे वळल्या आणि त्या तरुणाच्या कानशिलात लगावली आणि त्यानंतर तात्काळ पोलिसांनी त्या तरूणाला ताब्यात घेतले. पोलीस उपायुक्त राहुल कुमार एस यांनी दिलेल्या माहितीनुसार युवकाला स्थानिक पोलिसांना सोपविण्यात आले. यासंदर्भात अद्याप कोणताही गुन्हा नोंदवला गेला नाही. खुशबू यांनी तक्रार दाखल केल्यास गुन्हा दाखल केला जाईल.  खुशबू सुंदर या एक लोकप्रिय दक्षिण भारतीय अभिनेत्री, निर्मात्या आहेत. त्यांनी २०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. कर्नाटकातील लोकसभा निवडणुकांसाठी स्टार प्रचारकांपैकी खुशबू सुंदर या एक आहेत.

Web Title: Actress Khushboo slaps youth at election campaign rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.