शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरीतील ड्रग्ज रेव्ह पार्टीत रंगेहात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अभिनेत्री हिना पांचालला २३ दिवसानंतर दिलासा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 20:28 IST

२६जुन रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पथकासह बंगल्यांवर छापा मारुन पार्टी उधळली होती. यावेळी बंगल्यांमधून संशयित हिना पांचालसह, बॉलिवुडशी संबंधित कोरिओग्राफर, फोटोग्राफर असलेल्या १२ तरुणी, १० तरुण अशा एकुण २२ संशयितांना ताब्यात घेतले होते.

ठळक मुद्देया गुन्ह्यात पोलिसांना अद्यापही दोन संशयित हवे आहेकोकेन बंगल्यांमधील स्वीमींग टॅन्कमध्ये पुरावादेखील नष्ट करण्याचा प्रयत्न

नाशिक : ड्रग्जच्या सर्रास सेवनामुळे बहुचर्चित ठरलेली इगतपुरीमधील हवाईयन थीमवरील हायप्रोफाइल रेव्ह पार्टी ग्रामीण पोलिसांनी पहाटेच्या सुमारास छापा टाकून उधळली होती. याप्रकरणी एनडीपीएसच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या बॉलिवुड अभिनेत्री हिना पांचालसह अन्य संशयितांना जिल्हा व सत्र न्यायालयाने (दि.१९) सोमवारी जामीन मंजुर केला तर बर्थडे बॉय संशयित पियुष सेठीया आणि ज्याच्याकडे कोकेन मिळून आले तो हर्ष शहा याचा जामीन मात्र न्यायालयाने फेटाळून लावला.इगतपुरीतील दोन आलिशान बंगल्यांमध्ये अंमली पदार्थांच्या सर्रास सेवनासह मोठ्या संख्येने तरुण-तरुणींनी एकत्र येत दोन दिवसीय पार्टी रंगविल्याची कुणकुण ग्रामीण पोलिसांना लागली. पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक शर्मीष्ठा वालावलकर यांनी शनिवारी २६जुन रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पथकासह बंगल्यांवर छापा मारुन पार्टी उधळली होती. यावेळी बंगल्यांमधून संशयित हिना पांचालसह, बॉलिवुडशी संबंधित कोरिओग्राफर, फोटोग्राफर असलेल्या १२ तरुणी, १० तरुण अशा एकुण २२ संशयितांना ताब्यात घेतले होते. दोन दिवसांत या गुन्ह्यात बंगला मालकासह कोकेनसारखे अंमली पदार्थ पुरविणारा संशयित सराईत गुन्हेगार नायजेरियन उमाही पीटर यालाही पोलिसांनी मुंबईतुन अटक केली होती. त्यामुळे गुन्ह्यातील संशयितांची संख्या २७वर पोहचली होती. या गुन्ह्यात पोलिसांना अद्यापही दोन संशयित हवे असून त्यांचा शोध सुरु आहे. दरम्यान, विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी सरकारच्या वतीने युक्तीवाद केला.

टॅग्स :NashikनाशिकHeena Panchalहिना पांचाळigatpuri-acइगतपुरीtourismपर्यटनDrugsअमली पदार्थ