शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

२०० काेटींच्या खंडणीप्रकरणी अभिनेत्री गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 09:47 IST

दिल्ली पोलिसांची कारवाई; अधिकारी असल्याचा रचायची बनाव, २१ प्रकरणांत गुन्हेगार

ठळक मुद्देलीना पाॅल हिने मल्याळम, तेलुगू, तसेच तामिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘मद्रास कॅफे’ हा तिचा चित्रपट हिट झाला हाेता. एआयडीएमकेचे निवडणूक चिन्ह मिळवून देण्याच्या आराेपांखाली सुकेश चंद्रशेखर याला अटक करण्यात आली हाेती

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री लीना मारिया पाॅल हिला २०० काेटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी दिल्ली पाेलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सुकेश चंद्रशेखर याची ती प्रेयसी आहे. याच प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिचीही गेल्या आठवड्यात साक्षीदार म्हणून चाैकशी करण्यात आली हाेती.

लीना पाॅल हिने मल्याळम, तेलुगू, तसेच तामिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘मद्रास कॅफे’ हा तिचा चित्रपट हिट झाला हाेता. एआयडीएमकेचे निवडणूक चिन्ह मिळवून देण्याच्या आराेपांखाली सुकेश चंद्रशेखर याला अटक करण्यात आली हाेती. त्याने तुरुंगात असतानाच अनेकांकडून खंडणी उकळली आहे. फाेर्टीस हेल्थकेअर कंपनीचे प्रमाेटर मलविंदरसिंग आणि शिविंदरसिंग यांना तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी त्यांच्या पत्नींची फसवणूक केली हाेती. या प्रकरणात लीना पाॅल हिने मदत केल्याचा आराेप आहे. चंद्रशेखरच्या काेठडीतून पाेलिसांनी दाेन माेबाइल फाेन जप्त केले हाेते. तुरुंगातूनच ताे अनेक उद्याेगपतींच्या संपर्कात हाेता. ताे आणि लीना हे बडे अधिकारी असल्याचा बनाव रचून फसवणूक करायचे. लीनकडे अफाट संपत्ती असल्याचे आतापऱ्यंतच्या तपासात निष्पन्न झाले आहे. 

गँगस्टर रवी पुजारीच्या हिटलिस्टवर आहे लीना पाॅलnलीना पाॅल हिने माॅडेलिंगपासून कारकीर्द सुरू केली हाेती. काही चित्रपटांमध्ये तिने काम केल्यानंतर ती घाेटाळेबाजांच्या संपर्कात आली हाेती. अनेकांची फसवणूक करताना ती गँगस्टर रवी पुजारीच्या हिटलिस्टवरही आली हाेती. nकाेची येथे तिच्या ब्युटी पार्लरमध्ये तिच्यावर गाेळीबारही झाला हाेता. अनेक बड्या अभिनेत्रींकडेही नसतील एवढ्या आलिशान मालमत्ता तिच्या नावावर आहेत.

लीना लावायची पैशाची विल्हेवाटलीना पाॅलवर आतापर्यंत २१ प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल आहेत. चंद्रशेखर आणि लीना पाॅल यांनी २०१३ मध्ये एका बँकेचीही फसवणूक केली हाेती. तिला अनेकदा अटकही करण्यात आली आहे. खंडणीच्या नावाखाली उकळण्यात आलेला पैसा कुठे आहे, याची माहिती तिच्याकडे असल्याचा पाेलिसांचा दावा आहे. 

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीbollywoodबॉलिवूड