शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
3
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
4
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
5
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
6
रक्षा बंधन २०२५: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
7
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
8
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
9
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
10
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
11
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
12
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
13
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
14
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
15
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
16
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
18
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
19
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
20
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान

खंडणीप्रकरणात अभिनेत्रीला लातूरहून अटक, एटीएसचा उपनिरीक्षक निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 23:55 IST

रोल नंबर १८ या चित्रपटातील अभिनेत्याविरुद्ध विनयभंगाची तक्रार दाखल करुन गुन्हा मागे घ्यायचा असेल तर १५ लाखांची खंडणी मागणाऱ्या पुणे दहशतवादविरोधी पथकातील (एटीएस) पोलीस उपनिरीक्षक अमोल विष्णु टेकाळे याला निलंबित करण्यात आले असून तो सध्या फरार आहे. 

पुणे : रोल नंबर १८ या चित्रपटातील अभिनेत्याविरुद्ध विनयभंगाची तक्रार दाखल करुन गुन्हा मागे घ्यायचा असेल तर १५ लाखांची खंडणी मागणाऱ्या प्रकरणात गुन्हे शाखेच्या युनिट २ ने अभिनेत्री रोहिणी माने हिला लातूरहून अटक केली़ याप्रकरणातील पुणे दहशतवादविरोधी पथकातील (एटीएस) पोलीस उपनिरीक्षक अमोल विष्णु टेकाळे याला निलंबित करण्यात आले असून तो सध्या फरार आहे. 

याप्रकरणात सराईत गुन्हेगार राम भरत जगदाळे याला पोलिसांनी या अगोदर अटक केली आहे़ रोहिणी मच्छिंद्र माने (रा़ नळदुर्ग, ता़ तुळजापूर, जि़ उस्मानाबाद), अभिनेत्री सारा श्रावण ऊर्फ सारा गणेश सोनवणे (रा़ मुंबई, सध्या दुबई) आणि अमोल टेकाळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता़ हा प्रकार २८ सप्टेंबर २०१८ रोजी राम जगदाळे याच्या सहकारनगर येथील कार्यालयात घडला होता़ 

याप्रकरणी सुभाष दत्तात्रय यादव (रा़ गुलमोहर सोसायटी, शास्त्री रोड) यांनी फिर्याद दिली होती़ गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार हे याप्रकरणाचा तपास करीत असून अमित टेकाळे हा लातूरला असल्याची माहिती मिळाल्यावर ते लातूरला गेले होते़पण तेथून तो फरार झाला़ रोहिणी माने पोलिसांच्या हाताला लागली़ तिला पोलिसांनी अटक केली आहे़ 

याबाबतची माहिती अशी, रोल नंबर १८ मध्ये सुभाष यादव व रोहिणी माने यांनी अभिनेता व अभिनेत्री म्हणून काम केले होते़ चित्रपटाच्या प्रिमियरच्या पार्टीतील  यादव हे डान्स करीत असतानाचा व्हिडिओ काढला होता़ तो तिने नंतर सोशल मिडियावर टाकला व त्याखाली अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर यादव डान्स करताना असे टाकून त्यांची बदनामी केली होती़ त्यांनी त्याची तक्रार यादव यांनी वानवडी पोलिसांकडे केली होती़ पोलिसांनी अदखलपात्र अशी नोंद केली़ त्यानंतर त्यांना चौकशीसाठी बोलावले़ त्यावेळी रोहिणी माने, अमित टेकाळे हा तिथे होता़ पोलीस ठाण्यात आपला विनयभंग केल्याची रोहिणीची तक्रार घेऊन पोलिसांनी यादव यांना अटक केली होती़ त्यानंतर हे प्रकरण मिटविण्यासाठी त्यांना राम जगदाळे यांच्या कार्यालयात बोलावून घेतले व रोहिणीचे पाय धरायला लावले़ त्याचा व्हिडीओ काढला़ व त्यांच्या भावाकडून १ लाख रुपये घेतले़ त्यानंतर त्यांनी १५ लाख रुपयांची खंडणी मागितली़ ती त्यांनी न दिल्याने दुबईतील सारा हिच्या मार्फत हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला़ पोलीस आयुक्त डॉ़ व्यंकटेशम यांनी याचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविल्यानंतर या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन गुंड राम जगदाळे याला अटक करण्यात आली होती़ 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी