धक्कादायक! अभिनेत्रीसह बहिणीवर बलात्कार; पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2021 04:48 PM2021-05-09T16:48:00+5:302021-05-09T16:53:06+5:30

वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; कर्नाटक पोलिसांकडे तपास वर्ग

actress and her sister raped charges filed against five in nalasopara police station | धक्कादायक! अभिनेत्रीसह बहिणीवर बलात्कार; पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

धक्कादायक! अभिनेत्रीसह बहिणीवर बलात्कार; पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

Next

नालासोपारा: नायगाव परिसरात राहणाऱ्या २५ वर्षीय अभिनेत्रीसह तिच्या बहिणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना २४ ते २९ एप्रिलदरम्यान कर्नाटक राज्यात घडली आहे. पीडित अभिनेत्री तरुणीने शनिवारी वालीव पोलीस ठाण्यात तक्रार देऊन पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नायगाव परिसरात राहणाऱ्या २५ वर्षीय अभिनेत्रीच्या बहिणीला आरोपी महासुबेर परिद याने दारूमधून गुंगीकारक पदार्थ पाजून अभिनेत्रीसोबत जबरदस्तीने अत्याचार करून अश्लील चाळे केले. नंतर तिच्या बहिणीवरही जबरदस्तीने अत्याचार केले. आरोपी रमेश याने दोन्ही बहिणींचे हात धरून स्वतःजवळ ओढून अश्लील चाळे करून मनात लज्जा निर्माण केली. तर, आरोपी सुधीरकुमार चंद्रशेखर, अभिनव विख्यात, जगन्नाथ यांनी दोन्ही बहिणींना अर्धनग्न कपडे परिधान करण्यास सांगून त्याचे व्हिडीओ शूटिंग करून अश्लील काम करण्यास भाग पाडले. ते करण्यास नकार दिल्यावर पाचही आरोपींनी दोन्ही बहिणींना शिवीगाळ, दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

VIDEO: इंजेक्शन देताना नर्स म्हणाली, 'तुम्ही काही दिवसांच्या सोबती'; दुसऱ्याच दिवशी कोरोना रुग्णाचा मृत्यू

तक्रार दाखल; चौकशीसाठी गुन्हा कर्नाटक पोलिसांकडे वर्ग
या घटनेची तक्रारदार पोलीस ठाण्यात आल्यावर शनिवारी पाचही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचे स्थळ हे कर्नाटक राज्यातील असल्यामुळे सदर गुन्हा त्या पोलीस ठाण्यात तपास व चौकशीसाठी वर्ग करण्यात आला आहे.
- विलास चौगुले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वालीव पोलीस ठाणे

 

Web Title: actress and her sister raped charges filed against five in nalasopara police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app