अभिनेत्याच्या मुलाला अटक; मुंबई पोलिसांची ड्रग्ज प्रकरणी मोठी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 10:07 PM2021-05-05T22:07:45+5:302021-05-05T22:09:04+5:30

Drugs Case : आरोपी मुजमिल याचा मोबाइल तपासला असता त्याचे ध्रुव ताहील याच्यासोबत मेसेजद्वारे बोलणं झाल्याचे समोर आले. मेसेजवरून ध्रुव हा वारंवार ड्रग्जची मागणी करत होता असल्याची माहिती समोर आली. 

Actor's son arrested; Mumbai Police cracks down on drugs | अभिनेत्याच्या मुलाला अटक; मुंबई पोलिसांची ड्रग्ज प्रकरणी मोठी कारवाई

अभिनेत्याच्या मुलाला अटक; मुंबई पोलिसांची ड्रग्ज प्रकरणी मोठी कारवाई

googlenewsNext
ठळक मुद्दे ड्रग्ज प्रकरणात आता मुंबई पोलिसांनी एका अभिनेत्याच्या मुलाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव ध्रुव ताहील असे आहे.

ड्रग्ज प्रकरणात मुंबईपोलिसांनी मोठी कारवाई करत पुन्हा ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूड कनेक्शन समोर आल्यानंतर अनेक कलाकारांची चौकशी एनसीबीने केली. त्यानंतर काही कलाकारांना अटकही करण्यात आली होती. याच ड्रग्ज प्रकरणात आता मुंबईपोलिसांनी एका अभिनेत्याच्या मुलाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव ध्रुव ताहील असे आहे.

अभिनेता दिलीप ताहीलयांचा मुलगा ध्रुव ताहील याला ड्रग्ज प्रकरणात अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या अँन्टी नारकोटिक्स सेलने ही कारवाई केली आहे. ध्रुव ताहील हा एका ड्रग्ज पेडलरच्या संपर्कात होता आणि त्या ड्रग्ज पेडलरकडून ध्रुव वारंवार ड्रग्जची मागणी करत होता इतकेच नाही तर ड्रग्जसाठी त्याने पैसेही दिल्याचे उघड झाले आहे. ध्रुव ताहील आणि ड्रग्ज पेडलर यांच्यात झालेल्या मेसेजेसची माहिती समोर आल्यावर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ड्रग्ज पेडलर मुजमिल अब्दुल रहमान शेख याला अटक केली होती. आरोपीकडून पोलिसांनी ३५ ग्रॅम एमडी ड्रग्ज सुद्धा जप्त केले होते. आरोपी मुजमिल याचा मोबाइल तपासला असता त्याचे ध्रुव ताहील याच्यासोबत मेसेजद्वारे बोलणं झाल्याचे समोर आले. मेसेजवरून ध्रुव हा वारंवार ड्रग्जची मागणी करत होता असल्याची माहिती समोर आली. 

Web Title: Actor's son arrested; Mumbai Police cracks down on drugs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.