शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेता विजय राजला पोलिसांनी केली अटक, स्टाफमधील सहकारी तरुणीची काढली छेड  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2020 19:02 IST

Actor Vijay Raaz Arrested : अटक करुन केले न्यायालयात हजर

ठळक मुद्दे मध्यप्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून अभिनेत्री विद्या बालन यांची प्रमुख भूमिका असलेल्या शेरनी चित्रपटाची शुटींग सुरू आहे.

गोंदिया : चित्रपट अभिनेता विजय राज यांनी स्टाफमधील तरुणीची छेड काढल्याप्रकरणी तक्रारीवरुन रामनगर पोलिसांनी विजय राज याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. ही कारवाई सोमवारी (दि.२) रात्री करण्यात आली. आता विजय राजला पोलिसांनीअटक केली आहे. 

मध्यप्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून अभिनेत्री विद्या बालन यांची प्रमुख भूमिका असलेल्या शेरनी चित्रपटाची शुटींग सुरू आहे. चित्रपटाच्या शुटींग दरम्यान आणि गोंदिया येथील हॉटेल गेट वे येथे अभिनेता विजय राज यांनी सहकारी स्टाफमधील तरुणीची छेड काढली. सतत तीन दिवस हा प्रकार घडल्याने त्या तरुणीने सोमवारी रात्री रामनगर पोलीस स्टेशन गाठून विनयभंगाची तक्रार दाखल केली. तक्रारीवरुन गोंदिया रामनगर पोलिसांनी सोमवारी (दि.२) रात्री उशिरा ३५४ (अ), (ड) अन्वये गुन्हा दाखल केला. विजय राजला मंगळवारी (दि.३)गोंदिया येथील जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. प्राप्त माहितीनुसार शेरनी चित्रपटातील सर्व अभिनेते आणि त्यांचे सहकारी स्टॉफ गोंदिया येथील हॉटेल गेट वे मध्ये मागील पंधरा दिवसांपासून थांबलेेले आहेत. ते गोंदिया येथून दररोज शुटींग करीता मध्यप्रदेशातील बालाघाट येथे जातात. शुटींग दरम्यान आणि हॉटेलमध्ये विनोदी अभिनेता विजय राज याने आपल्या स्टॉफमधील तरुणीची सतत तीन दिवस छेड काढली. त्यामुळे त्यामुळे तरुणीने सोमवारी रात्री रामनगर पोलीस स्टेशन येथे तक्रारीवरुन पोलिसांनी विजय राज याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर विजय राजला पोलिसांनी अटक केली आहे. 

 

अभिनेता विजय राज याने हॉटेलमध्ये वास्तव्या दरम्यान आपल्याच स्टॉफमधील सहकारी कर्मचारी असलेल्या तरुणीची सतत तीन दिवस छेड काढली. याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरुन सोमवारी रात्री गुन्हा दाखल करुन अभिनेता विजय राज याला अटक करण्यात आली आहे. - प्रमोद घोंगे, ठाणेदार रामनगर गोंदिया.

टॅग्स :ArrestअटकMolestationविनयभंगPoliceपोलिसbollywoodबॉलिवूड