अभिनेता सलमान खान होता शार्प शूटरच्या निशाण्यावर; चौकशीत मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2022 09:49 IST2022-09-12T09:49:33+5:302022-09-12T09:49:52+5:30
राजस्थानच्या जोधपूरमध्ये चित्रीकरणाच्या कालावधीत काळविटाची शिकार केल्यानंतर अभिनेता सलमान खान याला मारण्याचा कट लॉरेन्स बिश्नोई रचत होता.

अभिनेता सलमान खान होता शार्प शूटरच्या निशाण्यावर; चौकशीत मोठा खुलासा
बलवंत तक्षक
चंडीगड : अभिनेता सलमान खान शार्प शूटर दीपक मुंडीच्या निशाण्यावर होता. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने मुंडी व त्याच्या एका साथीदारामार्फत सलमानची रेकी केली होती.
राजस्थानच्या जोधपूरमध्ये चित्रीकरणाच्या कालावधीत काळविटाची शिकार केल्यानंतर अभिनेता सलमान खान याला मारण्याचा कट लॉरेन्स बिश्नोई रचत होता. शार्प शूटर दीपक मुंडीच्या अटकेनंतर डीजीपी गौरव यादव यांनी ही बाब उघड केली आहे. पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या हत्येच्या आरोपात मुंडीला कपिल पंडित व राजिंदर जोकर या दोन साथीदारांसह शनिवारी नेपाळ सीमेवर अटक केली होती. तो दुबईमध्ये पलायनाच्या प्रयत्नात होता.