शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेता राहुल राज सिंगच्या अडचणीत वाढ; हॉटेलला दिलेले चेक झाले बाउन्स 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2019 20:31 IST

याप्रकरणी पार्टीचा आयोजक असलेल्या राहुल सिंगविरोधात फसवणुकीचा गुन्हा सांताक्रुज पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हॉटेल प्रशासनाने पुन्हा सांताक्रुज पोलिसांना राहुलने दिलेले चेक बाउन्स झाल्याप्रकरणी कळविले आहे. राहुलला हॉटेल बुक केल्याने ७ लाख २० हजार इतकी रक्कम द्यायची होती. 

ठळक मुद्दे राहुलला हॉटेल बुक केल्याने ७ लाख २० हजार इतकी रक्कम द्यायची होती. मात्र ते बाउन्स  झाले असल्याची माहिती हॉटेल प्रशासनाने पोलिसांना दिली

मुंबई - नवं वर्षानिमित्त मॉडेल आणि अभिनेता राहुल राज सिंगने जुहूतील एका हॉटेलात पार्टी आयोजित केली होती. त्यासाठी राहुलने ते हॉटेल बुक केले होते. मात्र त्याने आयोजित केलेल्या पार्टीतील लोकांनी नियोजनाप्रमाणे तसेच सांगितल्याप्रमाणे बॉलिवूडमधील गायक अंकित तिवारीचा परफॉर्मन्स न झाल्याने हॉटेलमध्ये तोडफोड करण्यात आली होती. त्यानंतर हॉटेलमधून सांताक्रुज पोलिसांना फोन आला आणि त्यांनी याबाबत पोलिसांना कळविले. हॉटेलचे सहा लाखांचे नुकसान झाले असल्याचे पोलिसांना माहिती देण्यात आली. याप्रकरणी पार्टीचा आयोजक असलेल्या राहुल सिंगविरोधात फसवणुकीचा गुन्हा सांताक्रुज पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हॉटेल प्रशासनाने पुन्हा सांताक्रुज पोलिसांना राहुलने दिलेले चेक बाउन्स झाल्याप्रकरणी कळविले आहे. राहुलला हॉटेल बुक केल्याने ७ लाख २० हजार इतकी रक्कम द्यायची होती. 

३१ डिसेंबरच्या रात्री १२. ३० वाजेपर्यंत जुहूतील एका हॉटेलमध्ये राहुलने पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत सामील होण्यासाठी काही लोकांनी पैसे माजून पास विकत घेतले होते. मात्र, या लोकांची हॉटेलात पोचल्यावर पुरती निराशा झाली होती. कारण पासवर नमूद केलेल्या सोयी- सुविधांचा अभाव होता. तसेच बॉलिवूड गायकाचा परफॉर्मन्स देखील नसल्याने भडकलेल्या गर्दीने हॉटेलमध्ये तोडफोड केली होती. याप्रकरणी सांताक्रुज पोलीस ठाण्यात राहुलविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असताना आता १४ डिसेंबर तारखेचा २ लाख ७० हजार आणि २१ डिसेंबर तारखेचा ४ लाख ५० हजार किंमतीचा चेक राहुलने हॉटेल प्रशासनाला दिले होते. मात्र ते बाउन्स  झाले असल्याची माहिती हॉटेल प्रशासनाने पोलिसांना दिली. त्यामुळे त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbollywoodबॉलिवूडPoliceपोलिस