अभिनेता एजाज खानला अटक; अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 20:13 IST2018-10-23T13:12:59+5:302018-10-23T20:13:22+5:30
त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक रवींद्र बुधवंत यांच्या पथकाने हॉटेलच्या रूमवर छापा टाकला. त्यावेळी त्याच्याकडे Ecstasy ड्रगच्या आठ गोळ्या आणि २ मोबाईल सापडले. तो अंधेरीला रहायला असून त्याच्याकडे हे अमली पदार्थ कुठून आले. त्याला हा अमली पदार्थ कोणी पुरविला याचा पोलीस तपास करत आहेत.

अभिनेता एजाज खानला अटक; अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई
नवी मुंबई - अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी सिने अभिनेता एजाज खान याला नवी मुंबई गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. सीबीडी बेलापूर सेक्टर 20 येथे आज सकाळी त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली. एजाज खान याने अनेक टिव्ही मालिका व बिग बॉसमध्ये काम केलेलं आहे. सीबीडी बेलापूर येथील एका हॉटेलमध्ये एजाज ड्रग्जच्या गोळ्या घेऊन येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक रवींद्र बुधवंत यांच्या पथकाने हॉटेलच्या रूमवर छापा टाकला. त्यावेळी त्याच्याकडे Ecstasy ड्रगच्या आठ गोळ्या आणि २ मोबाईल सापडले. तो अंधेरीला रहायला असून त्याच्याकडे हे अमली पदार्थ कुठून आले. त्याला हा अमली पदार्थ कोणी पुरविला याचा पोलीस तपास करत आहेत. २.३० ग्रॅम वजनाचा एमडीएम (Ecstasy) हा अमली पदार्थ पोलिसांनी खानकडून हस्तगत केला असून न्यायालयाने खानला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
Mumbai: Actor Ajaz Khan arrested from a hotel in Belapur* by Anti-Narcotics Cell of the Mumbai police last night, in possession of banned narcotic substance (8 ecstasy tablets); he will be produced before a court today. #Maharashtrahttps://t.co/4U5PlDUvCO
— ANI (@ANI) October 23, 2018