बारामती उपविभागातील २४ गुन्हेगारांवर सहा महिन्यांसाठी तडीपार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 11:45 PM2020-06-05T23:45:18+5:302020-06-05T23:51:51+5:30

२४ आरोपींवर बारामती व इंदापूर तालुक्यातील पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल

Action of fugitive on 24 criminals from Baramati sub-division for six months | बारामती उपविभागातील २४ गुन्हेगारांवर सहा महिन्यांसाठी तडीपार कारवाई

बारामती उपविभागातील २४ गुन्हेगारांवर सहा महिन्यांसाठी तडीपार कारवाई

Next
ठळक मुद्दे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी एकुण २४ आरोपींना तडीपार करण्याचे दिले आदेश

बारामती (सांगवी) : बारामती उपविभागातील खून, खुनाचा प्रयत्न, गर्दी मारीमारी, गंभीर दुखापत, दरोडा, खंडणी अशा गंभीर गुन्ह्याखालील एकुण २४ आरोपींवर तडीपारीची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी दिली आहे.

बारामती व इंदापूर तालुक्यातील पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असणाऱ्या आरोपींना तडीपार करण्या बाबत उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्याकडे प्रस्ताव प्राप्त आला असता, त्यांनी सदरच्या प्रस्तावांवाबत शहानिशा व चौकशी करून आरोपींना तडीपार करण्याबाबतचा अहवाल पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे सादर केला होता. त्यानुसार पोलीस अधीक्षक पाटील यांनी याबाबत शहानिशा करून एकुण २४  आरोपींना तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत. बारामती शहर पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यातील आरोपी अक्षय उर्फ आकाश यापू जाधव,  रविंद्र उर्फ पप्पू तुकाराम मदने, ( दोघे  रा. मळद ता.बारामती ) यांना पुणे जिल्हयातील इंदापुर, बारामती, दौंड तसेच अहमदनगर जिल्हयातील कर्जत, सोलापुर जिल्हातील माढा,
करमाळा व अकलुज या तालुक्यातुन हद्दपार करण्यात आले आहे. बारामती तालूका पोलीस ठाण्याखालील आरोपी दिपक तानाजी चव्हाण, ( ता.बारामती ) तुपार उर्फ जंब्या अंबाजी खोमणे, किरण शंकर खोमणे, राजन बाळासाहेब पैठणकर, सचिन विलास खरात, अमोल भारत जगताप, ऋपीकेश हनुमंत चव्हाण, संग्राम राजेंद्र चव्हाण, राहूल बाळासाहेब जाधव, (सर्व रा. माळेगांव, ता.बारामती ) मनोज बाळासाहेब पाटोळे, रा. शिरवली,( ता. बारामती ) यांना पुणे जिल्हयातील इंदापुर, बारामती, दौंड, पुरंदर तसेच सातारा जिल्हयातील फलटण व सोलापुर जिल्हातील माळशिरस या तालुक्यातुन हद्दपार करण्यात आले आहे. तसेच आरोपी बबलू उर्फ सौरभ मनोहर पवार, रा. रणगाव ( ता. इंदापुर ) प्रितम सुरेश जाधव, सचिन अर्जुन गोसावी, अनिकेत उर्फ बापू शिवाजी रणमोडे, इन्नू सरहिम नशिद पठाण रा. रणगाव,  संदिप रामभाऊ गोसावी रा. रणगाव,  महेश महादेव अर्जुन रा.चिखली ( ता. इंदापुर ) कुपदिप उबाळे रा .वालचंदनगर ( ता.इंदापूर ) तेजस शिवाजी जाधव रा.कळंब ( ता.इंदापूर ) नितीन हरिभाऊ भोसले रा.लासुर्णे ( ता.इंदापूर ) सचिन शिवाजी अर्जुन यांना पुणे जिल्हयातील इंदापुर, बारामती, दौंड तसेच सोलापुर जिल्हातील माढा व माळशिरस या तालुक्यातुन हद्दपार करण्यात आले आहे. तर  वालचंदनगर पोलीस स्टेशनमधील आरोपी कुलदीप पोपट रक्टे, (रा.रणगाव) ,पिंटू उर्फ दिपक औदुंबर, नितीन हरिभाऊ भोसले, रा.लासूर्णे ( ता.इंदापूर )  यांना पुणे जिल्हयातील इंदापुर, बारामती, दौंड तसेच सोलापुर जिल्हातील माढा व माळशिरस या तालुक्यातुन हद्दपार करण्यात आले आहे. 


 

Web Title: Action of fugitive on 24 criminals from Baramati sub-division for six months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.